अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी १६ इच्छुक उमेदवारांनी २४ उमेदवारी अर्ज घेतले. त्यापैकी कुणीही ते दाखल केले नाही.
रायगड लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी १६ इच्छुक जणांनी २४ उमेदवारी अर्ज घेतले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे तसेच यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एका व्यक्तीला कमाल ४ अर्ज घेता येतात. उमेदवारी अर्ज १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्जांचे वितरण व स्वीकृती सुरू राहणार आहे. २० एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, २२ एप्रिल रोजी तेमागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मतदान मंगळवारी ७ मे रोजी होणार असून मंगळवारी ४ जूनला मतमोजणी झाल्यानंतर ६ जून रोजी निवडणुक प्रक्रिया संपुष्टात येईल....गीते सोमवारी तर, तटकरे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणारमहाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते रायगड मतदार संघातून येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतची संपर्ण कार्यवाही पूर्ण केली आहे. तर, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...............अलिबागमध्ये पोलिस बंदोबस्तउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असल्याने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. अलिबाग येथील कोर्ट परिसरात बॅरिगेट्स लावण्यात आले होते. या बरोबर प्रत्येक ठिकाणच्या पाॅईन्टवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.