गोवा महामार्गावर २४ सीसीटीव्हींची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:34 AM2018-09-20T04:34:31+5:302018-09-20T04:34:53+5:30

महामार्गावर २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वाहतूककोंडी तत्काळ दूर करण्यात मदत

24 CCTs on the Goa highway | गोवा महामार्गावर २४ सीसीटीव्हींची नजर

गोवा महामार्गावर २४ सीसीटीव्हींची नजर

Next

दासगाव : गणेशोत्सवात मुंबई-गोवामहामार्गावर वाहतुकीची कोंडी ही प्रशासनाला मोठी डोकेदुखी असते. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आणि यात वरुणराजानेही साथ दिली. महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली. महामार्गावर २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वाहतूककोंडी तत्काळ दूर करण्यात मदत झाली.
चोख वाहतूक व्यवस्थेसाठी सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक असे ४२७ पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत होते. महामार्गावर २४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने वाहतूककोंडी तत्काळ दूर करण्यात मदत झाली.
८ सप्टेंबरपासूनच अवजड वाहतूक बंद झाल्याने लहान वाहनांना मोकळा रस्ता मिळाला. या वेळी खासगी वाहतूक महामार्गावर गतवर्षीच्या तुलनेत कमी दिसली. एसटी व रेल्वेने जादा वाहतूक सेवा सुरू केल्याने चाकरमान्यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले, याचा फटका खासगी वाहनांना जाणवला. गणेशोत्सवात मिळणाऱ्या भाड्यामध्ये कर्जाचे पुढील तीन-चार हप्ते भरले जात असत; परंतु यावर्षी भाडे कमी मिळाल्याचे वाहनचालक विनय सुर्वे यांनी सांगितले.
महामार्गावर पोलीस मदत केंद्रे, आरोग्य सुविधा व १२ ठिकाणी रुग्णवाहिका अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. वाहतूक व्यवस्था चोख राखल्याने रायगडात महामार्गावर एकही अपघात व खोळंबून ठेवणारी मोठी वाहतूककोंडी झाली नाही. यामुळे गणेशभक्तांची ये-जा सुखरूप झाली.
यंदा महामार्गावर वाहतूक सुखरूप व्हावी, म्हणून अवजड वाहनांना या काळात बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावर वाहतूककोंडीच्या ठिकाणी दुभाजक पर्यायी मार्गाचा वापर, पोलीस मदत केंद्रे व आरोग्य सुविधा, रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले. ११ ठिकाणी क्रे न, टोइंगची व्यवस्था करण्यात आली होती.
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी काही वेळासाठी वाहतूककोंडी झाली होती. मात्र, बुधवारी परतणाºया चाकरमान्यांना कोंडीतून उसंत मिळाली. महामार्गावर वाहतूक पूर्ववत झाली असून, माणगावपासून कशेडीपर्यंत महामार्गावर वाहतूककोंडी झाली नाही.
व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेली पोलीस यंत्रणा, पर्यायी वाहतूक मार्गाचा व एसटी, रेल्वेचा अधिक वापर याचबरोबर राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोकणात विघ्नहर्त्याच्या दर्शनाला येणाºया गणेशभक्तांपुढे कोणतेही विघ्न आले नाही.
चोख व्यवस्थेमुळे रायगडात एकही अपघात व मोठी वाहतूककोंडी झाली नाही.

Web Title: 24 CCTs on the Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.