अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान
By निखिल म्हात्रे | Published: May 2, 2024 08:28 PM2024-05-02T20:28:00+5:302024-05-02T20:28:35+5:30
एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे.
अलिबाग- अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यातील गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. २५६ जणांनी गृह मतदान केले असून टपाली मतदान घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत ही मतदारांनी केले आहे. एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाने या वर्षीपासून ज्येष्ठ व अपंग मतदारांची होत असलेली गैरसोय पाहता गृह मतदानाची सुविधा केली आहे. यासाठी रायगडमध्ये गेले काही दिवस नोंदणी सुरू होती.
श्रीवर्धन, गुहागर, दापोली यानंतर आज तिसऱ्या टप्प्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघांतून गृह मतदानाला गुरुवारी सुरुवात झाली. गुरुवारी २७५ मतदारांपैकी २५६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर उर्वरित ४ मे ला मतदान करणार आहेत. २७५ मतदारांसाठी २६ पथक तयार करण्यात आली होती. संध्याकाळ पर्यंत मतदान करण्याचे काम सुरु होते.
अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातील गृह मतदान करणाऱ्या 275 मतदारांसाठी 26 पथक तयार करण्यात आली होती. या प्रत्येक पथकात 6 जण असे एकूण 156 अधिकारी आणि कर्मचारी आपले काम चोखपणे बजावित होते.
दिव्यांगासह आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदार त्यांचा मतदानाचा अधिकार गृह मतदान करून बजावीत आहेत. मतदानासाठी मतदाराकडे पोहोचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाढला. आपल्या मनातल्या उमेदवाराला वर्षनुवर्षे मतदान केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
- मुकेश चव्हाण, अलिबाग प्रांताधिकारी.