खालापूर : सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चार जिल्हा परिषद गटातील १९ पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे १३ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या आठ गणासाठी ३९ पैकी १३ जणांनी माघार घेतल्यामुळे २६उमेदवार निवडणूक लढविणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. खालापूरातील चार गटापैकी वासांबे गट सर्वसाधारण महिलेकरिता आरिक्षत आहे. राष्ट्रवादीच्या उमा मुंडे यांच्या डमी प्रमिला दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे वासांबे गटात सेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत रंगणार आहे. वासांबे गणात शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या वृषाली पाटील व शिवसेनेच्या श्वेता म्हात्रे या दोनच उहेदवार असल्यामुळे आघाडी विरूद्ध सेना सामना होणार आहे. वासांबे गटातील दुसरा पंचायत समिती चांभार्ली गणात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी एक सेना व एका काँग्रेसच्या डमी ऊमेदवारानी माघार घेतली आहे. त्यामुळे चांभार्ली गणात भारिप बहुजन महासंघाकडून अश्विनी जाधव, भाजपाकडून सरिता जांभळे, काँग्रेसकडून कांचन पारंगे असून अपक्ष उमेदवार माधुरी पवार व आरपीआय आठवले गटाच्या मंजिरी मोहिते या पाच उमेदवारामध्ये लढत होणार आहे. चांभार्ली गणापुरती शिवसेना भाजपा युती झाली असून सेना उमेदवार सद्गुणा पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे. याशिवाय काँग्रेसच्या डमी उमेदवार रसिका पारंगे यांनी अर्ज मागे घेतला. चौक गटात अपक्ष सुरेश कदम यांनी अर्ज मागे घेतला. चौक गटातील दुसरा पंचायत समिती गण कलोते मोकाशी मध्ये शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. एकूण सात पैकी तीन जणांनी माघार घेतल्यामुळे चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
२६ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 4:58 AM