शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:03 AM

जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १४६ सरपंचपदांसाठी ३९१ उमेदवार, तर ९९८ सदस्यपदांच्या जागांसाठी २,१९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अलिबाग : जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १४६ सरपंचपदांसाठी ३९१ उमेदवार, तर ९९८ सदस्यपदांच्या जागांसाठी २,१९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत ३९ ग्रामपंचायतींमध्ये ५५३ सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. येत्या २७ मे रोजी जिल्ह्यातील विविध ५२६ केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम असल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागातील सत्ता आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच जोर आला आहे. अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणाºया १५ जागा आहेत, त्यासाठी ४७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सदस्यपदासाठी १५३ जागांसाठी ३४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढविणार आहेत.पेणमध्ये सरपंचपदासाठी सात जागा आहेत. त्यासाठी २३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत, तर सदस्यपदाच्या ६८ जागांसाठी १७२ उमेदवार आहेत. मुरु डमध्ये सरपंचपदासाठी १२ जागा असून, ३४ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ९७ जागा असून, २३९ उमेदवार रिंगणात आहेत.>अलिबागमध्ये ४७ उमेदवार रिंंगणातअलिबागमध्ये १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी थेट सरपंचपदांच्या १५ जागांसाठी ४७ तर सदस्यपदाच्या १५७ जागांसाठी ३४४ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे.तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसल्याने येथे शिवसेना, काँग्रेस, शेकाप अशा लढती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तिन्ही राजकीय पक्षांनी आपापली व्यूहरचना आखून विजयाचे फासे आपल्याच बाजूने कसे पडतील याची तयारी सुरू केली आहे.आवास, रेवदंडा, कामार्ले, मानकुळे, खानाव मिळकतखार या श्रीमंत ग्रामपंचायती म्हणून ओळखल्या जातात. येथील ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना लुभवण्यासाठी विविध आमिषेदाखवली जाण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच चुरस अनुभवाला मिळणार आहे. यासह वाडगाव, किहीम, शहाबाज, पेढांबे, वाघ्रण, चिंचवळी, खंडाळे, खिडकी, नागाव या ग्रामपंचायतींमध्येही निवडणूक रंगतदार होणार आहे. अलिबागमध्ये शिवसेना विरु ध्द शेकाप लढत होत आहे.रेवदंड्यात शेकाप विरु द्ध शिवसेना, आवासमध्ये काँग्रेस विरु द्ध शेकाप, खानावमध्ये काँग्रेस विरु द्ध शेकाप, शहाबाजमध्ये शेकाप विरु द्ध काँग्रेस, पेढांबे शेकाप विरु द्ध काँग्रेस, मानकुळे शेकाप विरु द्ध काँग्रेस, वाघ्रण शेकाप विरु द्ध काँग्रेस, कामार्ले शेकाप विरु द्ध काँग्रेस, चिंचवली काँग्रेस विरु द्ध शेकाप, खंडाळे शेकाप विरु द्ध काँग्रेस अशा निवडणुका होत आहेत.म्हसळ्यात दोन ग्रामपंचायती बिनविरोधम्हसळा : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यापैकी ठाकरोली आणि जांभूळ या दोन ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आल्याने १० ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्यांची निवडणूक होत आहे. वरवठणे, पांगलोली, कुडगाव, चिखलप, भेकºयाचा कोंड, कोळवट, नेवरु ळ, घूम, साळविंडे, आडी-महाड-खाडी या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. एकूण ८८ सदस्यांपैकी ५१ सदस्य बिनविरोध झाले असून उर्वरित २७ सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत.तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि चुरशीची होणाºया पांगलोली ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी म्हसळा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलिशेठ कौचाली यांचे चिरंजीव बिलाल कौचाली तर काँग्रेसतर्फे म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांचे वडील डॉ.अब्दुल अजीज शेख यांच्यात लढत होत आहे. डॉ.अब्दुल अजीज शेख हे गेली ४० ते ४५ वर्षे परिसरात वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. गेली २५ वर्षे जांभूळ ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते, परंतु या वेळी ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली असून सरपंचपदी सुशीला जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.>वासांबे, मोहोपाड्यातप्रचाराची रणधुमाळी सुरूमोहोपाडा : वासांबे, मोहोपाडा ग्रामपंचायत निवडणूक सरपंच व सदस्यांसह १७ जागांसाठी होणार असून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एक जागा बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला जास्त मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सदस्यपदासाठी १७ जागा आहेत, तर ३६ उमेदवार उभे ठाकले आहेत. कर्जतमध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदाच्या ३६ जागांवर ७५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. खालापूरमध्ये सरपंचपदासाठी १७ जागा असून, ४५ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी १४१ जागा असून, ३०० उमेदवार आहेत. माणगावमध्ये सरपंचपदासाठी १७ जागा आहेत, तर ४० उमेदवार राजकीय नशीब आजमावणार आहेत. सदस्यपदासाठी ८५ जागांवर १७३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.तळामध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ११ जागा असून, २३ उमेदवार आहेत. रोहामध्ये सरपंचपदासाठी सात जागा असल्याने तेथे २१ उमेदवार सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत, तर सदस्यपदाच्या ५१ जागांसाठी ११७ उमेदवार आहेत.सुधागडमध्ये सरपंचपदासाठी १० जागा असून, २३ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी ७५ जागा असून, १६४ उमेदवार आहेत.महाडमध्ये सरपंचपदासाठी १३ जागांवर ४० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, तर सदस्यपदासाठी ४९ जागांसाठी १०१ उमेदवार आहेत. पोलादपूरमध्ये सरपंचपदासाठी आठ जागा असून, १७ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी ५३ जागांवर १०८ उमेदवार आहेत.श्रीवर्धनमध्ये सरपंचपदासाठी पाच जागा असून, १२ उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी १८ जागा असून, ३७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.म्हसळामध्ये सरपंचपदासाठी १० जागा असून, २२ उमेदवार रिंगणात आहेत, तसेच सदस्यपदासाठी २७ जागांसाठी ५५ उमेदवार आहेत.संपूर्ण जिल्ह्यात एकूण १४६ सरपंचपदाच्या जागांसाठी ३९१ उमेदवार, तर सदस्यपदाच्या ९९८ जागांसाठी २,१९१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. जिल्ह्यातील ५२६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.पनवेलमध्ये सरपंचपदाच्या १४ जागांसाठी ३३ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत, तर ११७ सदस्यांच्या जागांसाठी २४७ उमेदवार आहेत. उरणमध्ये सरपंचपदासाठी एक जागा असून चार उमेदवार रिंगणात आहेत.