शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 12:17 PM

रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे

जयंत धुळपरायगड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याच्या राजधानीच्या दूर्गराज रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेच्या सहभाग आवाहनपत्नचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांच्या हस्ते गुरूवारी रायगड जिल्हा परिषदेत करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून रायगडची संवर्धन व विकासाकरिता सर्वप्रथम निवडदेशातील ऐतिहासीक गडकिल्ले ही तरण पिढीची स्फूर्तीस्थाने करणो आणि गतवैभवाच्या या ऐतिहासिक साक्षीदारांचे सवर्धन आणि विकास करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई जवळच्या समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणी प्रसंगी बोलताना जाहिर करुन, या योजनेंतर्गत रायगड किल्ल्याची देशात सर्वप्रथम संवर्धन आणि विकासाकरीता निवड केली असल्याने, यंदाच्या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणोचे महत्व आगळे आहे. या प्रदक्षिणोत राज्यभरातील युवक-युवतींनी सहभागी होवून महाराजांप्रती आदर व्यक्त करावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी या निमीत्ताने बोलताना केले आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवशी प्रदक्षिणार्थी सोबत प्रत्यक्ष सहभागी होणारदरम्यान रायगड किल्ला संवर्धन आणि विकास योजनेचे प्रमुख रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवशी या 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणोमध्ये आपल्या रायगड किल्ला विकास व संवर्धन यंत्नणोतील वरिष्ठ अधिका:यांच्यासह प्रदक्षिणार्थीसोबत सक्रि य सहभागी होणार असल्याचे डॉ.सूर्यवशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले. रायगड किल्ला विकास योजनेअंतर्गत रायगड प्रदक्षिणा मार्ग तयार करण्याचेही काम नियोजित विकास योजनेमध्ये आहे. त्याच अनुषंगाने प्रत्यक्ष प्रदक्षिणार्थीच्या समवेत सहभागी होवून रायगड प्रदक्षिणा मार्गाची पहाणी करुन या रायगड प्रदक्षिणा मार्गाच्या कामास अंतिम स्वरुप देण्याचा मनोदय डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान आणि एव्हरेस्ट विर सुरेंद्र चव्हाण मार्गदर्शन करणारदरम्यान रायगड प्रदक्षिणोत सहभागी होणा:या प्रदक्षिणार्थीना रायगड आणि परिसराच्या इतिहासाची माहिती देण्याकरिता ज्येष्ठ शिवकालीन इतिहास अभ्यासक शिल्पा परब-प्रधान या उपस्थित राहाणर आहेत, तर गियोरोहण व गडभ्रमंतीचे अनन्यसाधारण महत्व प्रदक्षिणार्थीना सांगून आपले अनूभव कथन करण्याकरिता भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवणारे एव्हरेस्टविर सुरेंद्र चव्हाण आवर्जून उपस्थित राहाणार असल्याची माहिती यावेळी युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांनी यावेळी दिली.

राज्यभरातून युवक-युवती मोठय़ा प्रमाणावर सहभागी होणार रायगड प्रदक्षिणा गेली 26 वर्ष आयोजित करण्यात येत असून छत्नपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या ऐतिहासिक भूमितील या  रायगड प्रदक्षिणोत राज्य व परराज्यातील युवक मोठय़ा संख्येने आजवर सहभागी झाले आहेत. यंदा देखील राज्यभरातून युवक-युवती मोठय़ा प्रमाणावर या रायगड प्रदक्षिणोत सहभागी होणार असल्याची माहिती युथ क्लब महाडचे अध्यक्ष संजीव मेहता यांनी दिली आहे. या रायगड प्रदक्षिणोमध्ये सहभागी होण्याकरीता मुंबई येथे युथ हॉस्टेल महाराष्ट्र राज्य शाखा कार्यालय, परळ-मुंबई (क्22-24126क्क्4)येथे संपर्क साधावा असे आवाहन रमेश केणी यांनी केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड