गणेशोत्सव स्पर्धेत २७४ मंडळे सहभागी; ‘लोकमत’ आणि रायगड पोलिसाचे संयुक्त आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:09 AM2017-08-20T03:09:19+5:302017-08-20T03:09:22+5:30

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ या स्पर्धेस

274 Mandal participants in Ganeshotsav competition; Jointly organized 'Lokmat' and Raigad Police | गणेशोत्सव स्पर्धेत २७४ मंडळे सहभागी; ‘लोकमत’ आणि रायगड पोलिसाचे संयुक्त आयोजन

गणेशोत्सव स्पर्धेत २७४ मंडळे सहभागी; ‘लोकमत’ आणि रायगड पोलिसाचे संयुक्त आयोजन

googlenewsNext

जयंत धुळप ।

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ या स्पर्धेस जिल्ह्यात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहयोग लाभलेल्या या स्पर्धेबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात माहिती देण्याकरिता ‘लोकमत
टीम’ने दोन दिवस केलेल्या दौ-यात विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व म्हणजे, २७४ गणेशमंडळे सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर स्वत: स्पर्धेच्या अनुषंगाने विविध सूचना व मार्गदर्शन करीत आहेत.

जिल्ह्यातील २७४ गणेश मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव २०१७ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पर्यावरणपूरक सजावटीला यात प्राधान्य असेल. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर स्वत: स्पर्धेच्या अनुषंगाने विविध सूचना व मार्गदर्शन करीत आहेत.

पोलादपूर येथे गणेशोत्सव मंडळ पदाधिकाºयांसमवेत बैठक यशस्वी
शुक्र वारी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील, बिरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्याशी स्पर्धा निकषाबाबत चर्चा करण्यात आली.
पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित करुन ‘लोकमत टीम’च्या माध्यमातून त्यांना स्पर्धेची माहिती दिली. या वेळी स्पर्धेच्या अनुषंगाने गणेशोत्सव मंडळ पदाधिकाºयांनी देखील चर्चेत भाग घेतला.
पोलादपूर तालुक्यांतील ऐतिहासिक उमरठ येथील शेलारमामा चौक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांनी स्पर्धेतील सहभागाकरिता आपला प्रवेश अर्ज पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्याकडे सुपूर्द करुन प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केला. गोरेगाव पोलीस निरीक्षक विक्रम जगताप आणि माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र परदेशी यांनी देखील ‘लोकमत’ टीमबरोबर चर्चा करुन त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळे स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.

श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकाºयांसमवेत बैठक संपन्न
गुरु वारी रेवदंडा येथे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, मुरु ड येथे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तळा येथे संजय साबळे यांच्याशी चर्चा करुन नियोजन करण्यात आले. श्रीवर्धन येथे श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार आणि पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, म्हसळा पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, दिघी सागरी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्यासमवेत स्पर्धा नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: 274 Mandal participants in Ganeshotsav competition; Jointly organized 'Lokmat' and Raigad Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.