५० लाख किमतीचे २८ टन गोमांस जप्त, उरण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:25 AM2018-07-05T02:25:43+5:302018-07-05T02:25:53+5:30

कोचिनवरून जेएनपीटीमार्गे परदेशात कतारमध्ये म्हशीच्या मांसाचा पाठविण्यात आलेला कंटेनर पुन्हा माघारी आल्यावर त्यात गाईचे मांस आढळून आले आहे.

 28 tonnes of beef worth 5 million worth of seized, Uran police action | ५० लाख किमतीचे २८ टन गोमांस जप्त, उरण पोलिसांची कारवाई

५० लाख किमतीचे २८ टन गोमांस जप्त, उरण पोलिसांची कारवाई

Next

उरण : कोचिनवरून जेएनपीटीमार्गे परदेशात कतारमध्ये म्हशीच्या मांसाचा पाठविण्यात आलेला कंटेनर पुन्हा माघारी आल्यावर त्यात गाईचे मांस आढळून आले आहे. तपासणीनंतर गोमांस आढळून आल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी भेंडखळ - उरण येथील यूएलए कंटेनर गोदामातून २८ टन गोमांस असलेला कंटेनर जप्त केला. बाजारपेठेत या गोमांसाची किंमत ५० लाखांच्या आसपास असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जेएनपीटी बंदरातून म्हशीच्या मांसाच्या नावाखाली २८ टन मांस कंटेनरमधून कतार येथे पाठविण्यात आले होते. म्हशीचे मांस असलेला कंटेनर संशयितरीत्या कतारमधून पुन्हा जेएनपीटी बंदरातून माघारी धाडण्यात आले आहे. भेंडखळ - उरण येथील यूएलए कंटेनर गोदामात हा कंटेनर ठेवण्यात आला होता. संशयास्पद स्थितीतील कंटेनरची सीमाशुल्क विभागाच्या अधिकाºयांनी तपासणी केल्यानंतर कंटेनरमध्ये गोमांस आढळून आले. फोरेन्सिक तपासणीच्या अहवालानंतर गोमांसच असल्याच्या अहवालानंतर सीमाशुल्क विभागाने उरण पोलिसात तक्रार केली. त्यानंतर उरण पोलिसांनी गोमांस भरलेला सीलबंद कंटेनर ताब्यात घेतला असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कतारला कंटेनरमधून पाठविण्यात आलेले म्हशीचे मांस पुन्हा जेएनपीटी बंदरातूनच परत का आले, परत आलेल्या कंटेनरमधून म्हशीच्या मांसाऐवजी गोमांस कसे आले हा सारा प्रकार संशयास्पद आहे. कतारमध्ये कंटेनर अदलाबदल झाली की येथूनच गोमांस निर्यात करण्यात आले आहे का? या संशयास्पद बाबींचा पोलीस तपासानंतरच उलगडा होईल. त्यासाठी पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली आहे.
तपासानंतरच संशयास्पदरीत्या आयात-निर्यात झालेल्या कंटेनर प्रकरणाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही
सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title:  28 tonnes of beef worth 5 million worth of seized, Uran police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.