- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या रुंदीकरणाच्या कामाला इंदापूर ते कशेडी अशी सुरुवात झाली आहे. या रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणारी झाडे तोडण्यात येणार असून, महाड तालुक्यातील वीर गाव हद्दीपासून पोलादपूरच्या भोगाव या ४० किमीपर्यंत २८१७ झाडांची तोड होणार आहे. नवीन महामार्ग झाल्यानंतर या रस्त्याचे काम हाती घेतलेल्या एल अॅण्ड टी कंपनीला वनखात्याकडून झाडे लावण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर ही कंपनी या ४० किमीच्या अंतरात १० हजार झाडे लावणार आहे. सध्या या तुटणाºया झाडांमुळे पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून, तसेच वनखात्याकडून वर्तविण्यात येत आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे दुसºया टप्प्याचे रुंदीकरणाचे काम मोठ्या तेजीत सुरू झाले आहे. शेतकºयांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर पैसा वाटप करत दुसºया टप्प्याचे इंदापूर ते कशेडी याचे काम सुरू झाले आहे. इंदापूर ते वीर एका कंपनीने ठेका घेतला असून वीर ते पोलादपूर भोगाव या ४० किमी अंतराचे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम एल अॅण्ड टी कंपनीने घेतले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येणारा डोंगर भाग, वळण, विजेचे खांब, टेलिफोन खांब काही दिवसातच हटवण्यात येणार असून रस्त्यालगत असलेली झाडे तोडण्यात येणार आहेत. सध्या महाड तालुक्याला प्रदूषणाचा फटका बसलेला आहे, तर नेहमी होणारा हवामानात बदल, अवेळी आणि वेळेपेक्षा उशिरा पडणारा पाऊस याचा मात्र नेहमीच नागरिक फटका सहन करत आले आहेत. सध्या या ४० किमीच्या अंतरात मोºयांची कामे व रस्त्याची लेवलिंग याची सुरुवात आहे. या रुंदीकरणाच्या कामाला अडथळे करणारी जुनी झाडे यांचे पंचनामे करण्यात आले असून, काही दिवसातच याची तोड करण्यात येणार असल्याचे ठेकेदार कंपनीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, होणाºया झाडांच्या तोडीनंतर या ४० किमीच्या परिसराला पर्यावरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वनखाते, तसेच तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.कोकणामध्ये अशा प्रकारच्या प्रकल्पातून सातत्याने वृक्षतोड होत असते. यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याला बाधा पोहोचते. नियमानुसार प्रकल्प पूर्ण होत असताना पुन्हा वृक्ष लागवड किंवा वनविभागाकडे ठरावीक अनामत रक्कम जमा करावयाची असते. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेका घेतलेली कंपनी अगर वनविभाग कितपत झाड लावते, हे आतापर्यंतच्या प्रकल्पातून दिसून आले आहे. यामुळे आता वृक्षतोड झाल्यानंतर वृक्षलागवड होणार की नाही हा चर्चेचा विषय आहे.अडथळा निर्माण करणाºया झाडांच्या तोडीसाठी पंचनामेमहाड तालुक्यातील वीर तर पोलादपूर तालुक्यातील भोगाव या ४० किमीच्या अंतरामध्ये रस्त्यालगत रुंदीकरणाच्या कामात अडथळा करणाºया २८१७ झाडांची तोड होणार असल्याची माहिती ठेकेदार कंपनी, तसेच वनखात्याकडून प्राप्त झाली आहे. ४० किमी या अंतरापर्यंत वनखात्याने तीन गट (टप्पे) तयार केले आहे.पोलादपूर गट, महाड आणि दासगाव गटात १०७१ झाडे, महाड गटात १०४९ आणि पोलादपूर ६९७ झाडे अशी २८१७ झाडांचा नवीन महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अडथळा निर्माण करणाºया झाडांच्या तोडीसाठी पंचनामे करण्यात आले आहेत.या पंचनाम्यामध्ये फळझाडे आणि जंगली दोन्ही जातीच्या झाडांचा समावेश आहे. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत पोलादपूर गटातील ६९७ झाडांना वनखात्याकडून तोडण्यास परवानगी मिळाली असून, दासगाव आणि महाड गटातील झाडांना काही दिवसातच तोडीचा परवाना देण्यात येणार असल्याची माहिती महाड पोलादपूर विभागाचे वनक्षेत्रपाल के. वाय. पाथरवट यांनी दिली.या झाडांच्या तोडीनंतर १० हजार झाडे पुन्हा एल अॅण्ड टी कंपनीला या ४० किमीच्या अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा पाच हजार तर रस्त्याच्या दुभाजकाच्या ठिकाणी पाच हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती एल अॅण्ड टी कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.लागवडीसाठी नर्सरीतून झाडेएल अॅण्ड टी कंपनीने या ४० किमीचा अंतराचा नवीन रस्ता तयार झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा तसेच दुभाजक ठिकाणी लावण्यासाठी महाड शहरानजीक रायगड रस्त्यावर असलेल्या एका नर्सरीमध्ये झाडांची आॅर्डर दिली आहे.रस्त्याकडेला असलेली जी झाडे तोडण्यात येणार आहेत त्याच जातीची दुतर्फा पाच हजार झाडे लावणार असून, दुभाजक ठिकाणी शोची झाडे, फुलांची झाडे, तसेच गाड्यांचा उजेड थांबविणारी झाडे लावणार असल्याचे कंपनीच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे. मात्र, झाड लावल्यानंतर या झाडाची कमीत कमी तीन वर्षे जोपासणा होणे गरजेचे आहे.नवीन झाडे लावणारया महामार्गाच्या कामात तोडण्यात येणारी झाडे ही मोठी आहेत. या २८१७ झाडांच्या तोडीनंतर या विभागातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पावसाने प्रमाण कमी होणे, रस्त्यालगत मिळणारी सावली, मातीची धूप तसेच तोडीनंतर गारवा कमी होऊन या विभागातील तापमानाचा मोठा फटका बसणार आहे, तर जमिनीमधील पाण्याचेही प्रमाण कमी होणार असल्याची शक्यता आहे. नवीन लावण्यात येणारी झाडे मोठी होण्यासाठी कमीत कमी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्याहून महत्त्वाचा विषय झाडे लावणे, झाडांचा थेट फटका पर्यावरणाला बसणार आहे.रस्त्याच्या कामासाठी तुटणाºया झाडांमुळे पर्यावरणावर याचा परिणाम काही अंशी होणार आहे. मात्र, त्यासाठी पुन्हा कडेला झाडे लावणे गरजेचे आहे. कंपनीला झाडे लावण्यासाठी दहा हजारचे टार्गेट देण्यात आले आहे. एल अॅण्ड टी कंपनी ही याची कितपत अंमलबजावणी करणार याचा पाठपुरावा वनखात्याकडूनस करण्यात येणार आहे.- के. वाय. पाथरवट, वनक्षेत्रपाल,महाड पोलादपूर वनविभाग
रुंदीकरणात २८१७ झाडांची होणार कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 3:12 AM