पनवेलच्या बापटवाड्यातील २८९ वर्षांची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:33 AM2018-09-04T00:33:44+5:302018-09-04T00:33:52+5:30
गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे.
पनवेल : गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे.
शहरात गोपाळकालानिमित्त सर्व अस्ताने एकत्र येऊन सोसायटीमधील नवनाथ मंदिरामध्ये पूजा केली जाते. त्यानंतर महाडिक अस्तान, चव्हाण अस्तान, दाभणे अस्तान, जाधव अस्तान, बापटवाडा, रामधरणे अस्तान, धुमाळ अस्तान, गावदेवी मंदिर, घरत अस्तान अशा क्र माने देवांच्या हंड्या काठीच्या साहाय्याने फोडल्या जातात. दरम्यान, अंगात आलेल्या भक्ताच्या अंगावर कोड्याने फटके मारले जातात. सर्व अस्तानांच्या हंड्या फोडल्यानंतर बल्लाळेश्वर मंदिराच्या घाटावर सर्व कोडे एका रांगेत लावून त्यांची पूजा केली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शहरात नागरिक एकत्र येत असतात. मागील २८८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडल्या जात असतात. गावातील सर्व कुटुंबे एकत्र येऊन आपल्या घराजवळ मानाच्या हंड्या बांधत असतात. गावातील तरु ण एकत्र येऊन या हंड्या फोडत असतात. एकीकडे दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रु पयांचे बक्षीस लावले जाते. हा ट्रेंड तयार होत असताना पारंपरिक दहीहंडीचा उत्साह आजही कायम आहे .