अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २९.४९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. १ जूनपासून गुरुवारअखेर एकूण सरासरी ३६३.३६ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.गुरु वारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्या नागरिकांची तारांबळ झाली. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाची सर्वाधिक नोंद श्रीवर्धनमध्ये १६७ मि.मी. झाली आहे. त्याखालोखाल म्हसळा ८८ मि.मी. तर कर्जत व पनवेल तालुक्यात पाऊसच पडलेला नाही.चोवीस तासांत अलिबागमध्ये २ मि.मी., पेण ९ मि.मी., मुरु ड २४ मि.मी., उरण २.५० मि.मी., खालापूर ७ मि.मी., माणगांव ३६ मि.मी., रोहा ११ मि.मी., सुधागड १४ मि.मी., तळा ३० मि.मी., महाड-३० मि.मी., पोलादपूर ५१ मि.मी., म्हसळा ८८ मि.मी., श्रीवर्धन १६७ मि.मी., माथेरान ०.४० मि.मी. असे एकूण पर्जन्यमान ४७१.९० मि.मी. इतके झाले आहे. त्याची सरासरी २९.४९ मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमान ११.५६ टक्के इतकी आहे.
रायगड जिल्ह्यात २९.४९ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:46 PM