रायगडमध्ये २९७ कोरोनाबाधित क्षेत्र, बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:07 AM2020-06-25T01:07:14+5:302020-06-25T01:07:18+5:30

तर २९७ ठिकाणे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवसांकरिता ‘कोरोना विषाणूबाधित क्षेत्र’ घोषित करण्यात आली आहेत.

297 corona-affected areas in Raigad, no entry to the affected areas | रायगडमध्ये २९७ कोरोनाबाधित क्षेत्र, बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी

रायगडमध्ये २९७ कोरोनाबाधित क्षेत्र, बाधित क्षेत्रात प्रवेश बंदी

googlenewsNext

अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रु ग्ण ज्या परिसरात आढळून आले आहेत, त्या ठिकाणचा परिसर ‘कोरोना विषाणू बाधित क्षेत्र’ घोषित करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३२६ कोरोना विषाणूबाधित क्षेत्र होते. त्यामधून २९ बाधित क्षेत्रे वगळण्यात आली आहेत, तर २९७ ठिकाणे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवसांकरिता ‘कोरोना विषाणूबाधित क्षेत्र’ घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३२६ ठिकाणांतील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास, तसेच बाहेरून येणाºया लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. बुधवारी अलिबाग तालुक्यातील खाली मांडवखार, पोयनाड, वालवडे अशा तीन ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस ‘कोरोना बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.
अलिबाग तालुक्यातील वालवडे परिसर अलिबाग तालुक्यातील मौजे वालवडे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने, या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या वालवडे येथील रु ग्ण राहत असलेले घर व त्याचा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मांडवखार परिसरातील बाधित रुग्ण राहत असलेले घर व त्याच्या लगतची २३ घरे व त्यांचा परिसर त्याचप्रमाणे, पोयनाड परिसरात रुग्ण राहत असलेले घर व परिसर ूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
>जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोनाबाधीत क्षेत्रात प्रवेश करण्यास व तेथून बाहेर जाण्यास पुढील २८ दिवस मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधीत आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Web Title: 297 corona-affected areas in Raigad, no entry to the affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.