मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:31 AM2020-01-08T01:31:41+5:302020-01-08T01:31:48+5:30

मालमत्ताधारकांच्या वाढीव घरपट्टी आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार समस्या निवारण मोहीम दहा दिवस राबविण्यात आली.

3 applications filed in Property Complaint Troubleshooting Campaign | मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल

मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल

Next

कर्जत : नगरपरिषदेच्या मालमत्ता करवसुली विभागातर्फे मालमत्ताधारकांच्या वाढीव घरपट्टी आणि त्यातील तांत्रिक त्रुटींबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार समस्या निवारण मोहीम दहा दिवस राबविण्यात आली. मालमत्ता तक्रार समस्या निवारण मोहिमेमध्ये ४२७ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामध्ये १४१ मालमत्ताधारकांच्या घरपट्टीतील त्रुटी लगेच दूर करण्यात आल्या. या माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीत २० लाख ५३ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी दिली.
नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांना मालमत्ता विभागातर्फे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगरपरिषद हद्दीत रिक्षा फिरून तसे आवाहनही करण्यात आले होते की, मालमत्तेसंबंधी काही त्रुटी किंवा बदल असल्यास त्या-त्या प्रभागातील मालमत्ताधारकांनी नियोजित ठरलेल्या दिवशी आपली तक्रार कागदपत्रांच्या पुराव्यासहित मालमत्ता तक्रार समस्या निवारण केंद्रावर घेऊन यावे.
हे केंद्र नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर २५ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी २०२० पर्यंत राबविण्यात आले, या दहा दिवसांत ४२७ अर्ज दाखल झाले आहेत, त्यामध्ये १४१ मालमत्ताधारकांच्या घरपट्टीतील त्रुटी लगेच दूर करण्यात आल्या. या माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीत २० लाख ५३ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या संकल्पनेतून मालमत्ता तक्रार समस्या निराकारण मोहीम राबविण्यात आली. करविभागाचे अधीक्षक सुरेश खैरे यांच्यासह नरेंद्र गजभिये, सचिन सोनवणे, हृदयनाथ गायकवाड, संजय पाटील, प्रभाकर कोचुरे आणि पाणी विभागाचे अभियंता अशोक भालेराव यांनी संबंधित तक्रारीचे निरसन
केले.
मालमत्ता हस्तांतर करण्याबाबत ८२ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ४० निकाली काढण्यात आले.
भोगवटादार सदरी नाव कमी किंवा टाकणे, याबाबत ४१ अर्ज दाखल आहेत.
मालमत्ताधारकांच्या पत्त्यात दुरुस्ती करणे याबाबत २६ अर्ज दाखल झाले होते, ते सर्वच्या सर्व निकाली लागले आहेत.
चुकीची घरपट्टी लागल्याबाबत ८४ अर्ज दाखल झाले आहेत.
मालमत्तेची विभागणी करणे व स्वतंत्र बिल मिळण्याबाबत २८ अर्ज दाखल झाले आहेत.
नवीन मालमत्ता नोंद करण्याबाबत ३९ अर्ज दाखल झाले आहेत.
अनधिकृत मालमत्ता शास्तीबाबत १२७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ८५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

Web Title: 3 applications filed in Property Complaint Troubleshooting Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.