कर्जत : १८९ - कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये (१८९) शुक्रवारी १७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत चार अर्ज अवैध ठरले आहेत, तर १४ अर्ज वैध ठरले आहेत.अॅड. गोपाळ गुंजा शेळके (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया), विद्यमान आ. सुरेश नारायण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेश चिंतामण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), किशोर नारायण शितोळे (जनहित लोकशाही पार्टी), पुष्पा मंगेश म्हात्रे (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), शरद लक्ष्मण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), जैतू कानू पिरकड (अपक्ष), महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना), निखिल रामचंद्र हरपुडे (अपक्ष), रमेश शांताराम कदम (जनहित लोकशाही पार्टी), नरेन वासुदेव जाधव (अपक्ष), अक्रम मोहम्मद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी) यांचे दोन अर्ज, मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी), सुरेश तुकाराम लाड (अपक्ष), यशवंत नामदेव मुळे (महाराष्ट्रात क्रांती सेना), संजय गणपत अभंगे (अपक्ष) आणि प्रकाश भिवाजी महाडिक (बहुजन महापार्टी) अशा १७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुरेश लाड आहेत, त्यामुळे शरद लाड यांचा अर्ज अवैध ठरला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार यशवंत मुळे व अपक्ष उमेदवार संजय अभंगे या दोघांच्या अर्जासोबत शपथपत्र जोडले नसल्यामुळे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अक्रम मोहम्मद इस्लाम खान यांनी दोन अर्ज भरले होते, त्यापैकी एका अर्जावर सूचक नसल्यामुळे त्यांचा असे चार अर्ज अवैध ठरले आहेत. तर उरलेले १४ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये १४ उमेदवारांचे अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:09 AM