पेणमधील हेटवणे-शहापाडा जलवाहिनीसाठी ३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:20 AM2018-11-21T00:20:40+5:302018-11-21T00:21:05+5:30

- दत्ता म्हात्रे पेण : पेण खारेपाटातील दक्षिण व उत्तर शहापाडा पाणी योजनेतील वाशी व वडखळ येथील पाणीटंचाईचा प्रश्न ...

 30 crore for Hetwah-Shahpada water tank in Pen | पेणमधील हेटवणे-शहापाडा जलवाहिनीसाठी ३० कोटी

पेणमधील हेटवणे-शहापाडा जलवाहिनीसाठी ३० कोटी

googlenewsNext

- दत्ता म्हात्रे

पेण : पेण खारेपाटातील दक्षिण व उत्तर शहापाडा पाणी योजनेतील वाशी व वडखळ येथील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी नुकतीच आमदार धैर्यशील पाटील यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीमधे ३० कोटी निधी मंजुरीची हेटवणे ते शहापाडा धरण जोडणारी १९ किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती ठेकेदाराकडून घेण्यात आली. हे काम जानेवारीत पूर्ण होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे वाशी, वडखळमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खारेपाटातील २७ गावे व वाड्यांना या योजनेंतर्गत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खारेपाटातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट लवकरच थांबेल आणि पाणीटंचाईची समस्या कायमची निकाली निघेल, असा विश्वास ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.
आढावा बैठकीत योजनेच्या कामाची माहिती घेताना आ. पाटील यांनी, हेटवणे धरण ते शहापाडा धरण या १९ कि.मी अंतरामधील पाइपलाइनचे काम प्रगतिपथावर
आहे व निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर काम पूर्ण झाले असून शहापाडा धरणापर्यंतच्या जलवाहिनीचे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार
आहे.
आढावा बैठकीत वाशी विभागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फेब्रुवारीत
पाणीपुरवठा !
हेटवणे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी सतत शहापाडा धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा वापर करून शहापाडा धरणाचा पाणीसाठा वाढून उत्तर योजनेतील २७ गावे वाड्यांना मुबलक पाणी मिळेल.
वाशी व मसद शिर्की या दोन विभागात वितरीत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे कामही जानेवारी महिन्यातच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
त्यादृष्टीने शीघ्रगतीने काम सुरू असल्याचे बैठकीत ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित हेटवण्याची गंगा लवकरच खारेपाटात अवतरेल, अशी शक्यता आहे.

Web Title:  30 crore for Hetwah-Shahpada water tank in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड