३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:05 AM2019-01-03T00:05:48+5:302019-01-03T00:06:06+5:30
पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
पेण : पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. जोशी, डोईफोडे, महाकाळे या वेळी उपस्थित होते.
संबंधित कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या कामगार टीमने संबंधित कामास प्रारंभ क रताच शेकापचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, झेडपी सदस्य, सरपंच व उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून जोरदार घोषणाबाजी केली. ‘क ोण म्हणतोय पाणी आणणार नाय, आणल्याशिवाय राहणार नाय’ ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ या घोषणेमुळे नवीन वर्षारंभी या पाणीपुरवठा योजनेतील श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाली असून, निवडणूक वर्षात या श्रेयवादाचे राजकीय नाट्य चांगलेच राजकीय रंग भरणार आहे.
पेणच्या हेटवण्याचे पाणी वाशी खारेपाटाला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांत या पाण्यावरून अनेकदा राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, या पाण्याचा राजकीय रंगात शेकापच नेहमी पुढे राहीला आहे. शेकापचा आ. विरोधी बाकावरचा असल्याने खारेपाटाला पाणी योजना राबविण्याकामी आंदोलने, मोर्चे या आयुधाद्वारे आ. धैर्यशील पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. यानंतर आ. धैर्यशील पाटील यांनी हेटवणे धरणाचे पाणी घेऊन पेण ते वर्षा मुख्यमंत्री निवास अशी वर्षावारी केली. त्या वेळी महाराष्टÑ दुष्काळाच्या छायेत होता. गमतीची बाब अशी की, पेणमध्ये हेटवणे धरणात मुबलक पाणी पडून असताना वितरण व्यवस्थेअभावी हे पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याकामी एका मोठ्या निधीची आवश्यकता होती. ती वर्षावारी मुंबई मुख्यमंत्री निवासी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए क्षेत्रात पेणचा समावेश असल्याने ३० कोटींचा निधी या योजनेसाठी मंजूर केला. त्या योजनेचे १० जुलै २०१८ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ई-भूमीपूजन केले.