- संजय गायकवाडकर्जत : कर्जत तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत. विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले असून रस्ते विकासासाठी तब्बल ३० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.आमदार सुरेश लाड यांनी विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सतत पाठपुरावा केला. कर्जत तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुरु स्ती करण्यासाठी २२ कोटी ६२ लाखांचा निधी जाहीर झाला आहे. या निधीमधून कर्जत तालुक्यात प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा चौक-कर्जत या राज्यमार्ग रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील वाढते पर्यटन लक्षात घेऊन लाड यांनी भीमाशंकर गणपती घाट या राज्यमार्गाच्या डांबरीकरण कामासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. माथेरान राज्यमार्ग १०२ वर नेरळ-कळंब भागात डांबरीकरण करण्यासाठी तब्बल साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित राज्यमार्ग म्हणून जाहीर झालेल्या उकरूळ-कडाव-जांभिवली-गौरकामत-वेणगाव-दहिवली-कोंडीवडे या रस्त्यावर दोन टप्प्यात डांबरीकरणाची कामे अर्थसंकल्पात मंजूर असून त्या कामांसाठी तब्बल ८ कोटी ५२ लाख इतका मोठा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील कोठिंबे-जामरु ंग या प्रमुख जिल्हा मार्गावर डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी रु पयांची तरतूद देखील शासनाने केली आहे. अशा प्रकारे तालुक्यातील प्रमुख रस्ते चकाचक करण्यासाठी तब्बल २२ कोटी ६२ लाखांचा निधी मिळवण्यात यश आले आहे.कर्जत तालुक्याचा निम्मा भाग आदिवासी विकास विभागात येत असून त्या भागातील रस्त्यांची दुरु स्ती आणि नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी १३ कामांना आमदार लाड यांनी मंजुरी मिळविली आहे. त्यासाठी ६ कोटी २० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहेत. आदिवासी विभागातील काठेवाडी-अंभेरपाडा, बळीवरे-चिंचवाडी, नांदगाव-भोमळवाडी-मोहोपाडा, मार्गाचीवाडी-ताडवाडी-जांभूळपाडा, नांदगाव-अंभेरपाडा,चेवणे-भोपळेवाडी, मेंगाळवाडी-टेपाचीवाडी-चाफेवाडी या ७ रस्त्याच्या सुधारणेसाठी प्रत्येकी ४० लाखांच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.टेंबरे-शिंगढोल रस्त्यासाठी ३० लाख, कळंब-पाषाणे रस्त्यावरून खडकवाडी जोडरस्ता सुधारणेसाठी ५० लाख रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. चिकनपाडा-माले रस्त्यावर १ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ४० लाख, तर शिलारवाडी-पिंपळपाडा रस्त्यावरील ३ किलोमीटर भागात सुधारणेसाठी ८० लाखांची तरतूद आदिवासी विकास विभागाने केली आहे. त्याशिवाय दोन नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी आदिवासी विकास विभागाने १ कोटीचा निधी मंजूर केला आहे.>कर्जत तालुकाआदिवासी विभाग ६ कोटी २० लाखसर्वसाधारण विभाग २२ कोटी ६२ लाख>खालापूर तालुकाआदिवासी विभाग १ कोटी ९० लाखसर्वसाधारण विभाग १४ कोटी ५० लाख
रस्ते विकासासाठी ३० कोटींचा निधी, कर्जतमध्ये डांबरीकरणासाठी २२.६२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:56 AM