पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमात 30 भाविकांनी घेतला सहभाग

By वैभव गायकर | Published: September 21, 2023 04:25 PM2023-09-21T16:25:58+5:302023-09-21T16:26:43+5:30

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 7955 गणपतिंचे विविध विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले.

30 devotees participated in the idol donation activity of the municipality | पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमात 30 भाविकांनी घेतला सहभाग

पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमात 30 भाविकांनी घेतला सहभाग

googlenewsNext

पनवेल: पनवेल महानगरपालिकेने सुरु केलेल्या मूर्तीदान उपक्रमाला पनवेलकराकडून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दीड दिवसांच्या बाप्पाना बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावर्षी पनवेल महानगरपालिकेने आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेने हाती घेतलेल्या मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.30 भाविकांनी पालिकेकडे आपल्या मूर्ती दान केल्या आहेत.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 7955 गणपतींचे विविध विसर्जन घाटांवर विसर्जन करण्यात आले. यापैकी 714 मुर्तीचे पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.पालिकेने नागरिकांना आपल्या मूर्ती पालिकेने तयार केलेल्या मूर्तीदान केंद्रात दान करण्याचे अवाहन केले आहे.या मुर्तीची पालिकेकडून विधिवत कोपरा खाडीत एकत्रित विसर्जन केले जात आहे.उपायुक्त डॉ वैभव विधाते यांच्या माध्यमातून या मूर्तीदान उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत प्रथमच नव्या मुंबईत अशाप्रकारे मूर्तीदान उपक्रम राबविण्यात आला आहे. याकरिता पालिकेने जनजागृतीवर देखील भर दिला आहे.

Web Title: 30 devotees participated in the idol donation activity of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.