महाड: रायगडमधील महाड तालुक्यातील तलीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील जवळपास ३० घरांवर दरड कोसळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७२ रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्यानं अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तलीये गावात संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून सुमारे ३० घरं गाडली गेली असून ७२ लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरड किती घरांवर कोसळली आणि त्यामुळे किती माणसं अडकली आहेत, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही. तरीही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतशी बोलताना दिली.