शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

समाज माध्यमांमुळे रायगडमध्ये ३० टक्के घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 1:11 AM

कौटुंबिक कलहास मोबाइल कारणीभूत : धक्कादायक माहिती

- निखिल म्हात्रेअलिबाग : सध्याच्या युगात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. मात्र, सोशल मीडियामुळेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात समाज माध्यमाच्या वादातून ३० टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.समाज माध्यमांसारख्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्यात आल्यानंतर वापरकर्ते अक्षरश: त्यांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे मोबाइल हेच आपले जग अशा मानसिकतेत असलेल्या नागरिकांमध्ये कौटुंबिक वाद वाढत चालले आहेत. अशाच वादातून ३० टक्के घटस्फोेट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरापासून दूर असताना कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी फायदेशीर ठरणारा मोबाइल अनेकांना कुटुंबापासून दूर नेत आहे. अनेक जणघरात कुटुंबासमवेत असताना तासन्तास मोबाइलवर घालविताना आढळून येतात. यामुळे घराच्यांसोबत आपुलकीचा संवादच होत नसल्याचे दिसून येते.व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यांसारख्या समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे पती-पत्नींमध्येही दुरावा वाढत चालला आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण व्हॉट्स अ‍ॅपवरील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड, छायाचित्रे आदी पुरावे गोळा करेपर्यंत पोहोचते आणि त्यातूनच गंभीर गुन्ह्याची पातळी गाठली जाते. अशी अनेक प्रकरणे निवाड्यासाठी येत असतात. महिला आणि बालकल्याण विभागाच्या सखी विभाग व कौटुंबिक न्यायालयाद्वारे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कौटुंबिक कलहात समेट करणे अत्यावश्यक होत असल्याचे महिला विभागाकडून सांगण्यात आले आहे.तरु ण दाम्पत्यांमध्ये संशयी वृत्ती वाढली आहे. याला समाज माध्यमांमुळे खतपाणी मिळत आहे. पती-पत्नीत वाद निर्माण होत आहेत. यात मोबाइलचा अति वापर हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मोबाइलचा अति वापर टाळण्यासाठी नव्या पिढीला समुपदेशन करणे गरजेचे आहे. - अ‍ॅड. निहा राऊतपती-पत्नीमधील विश्वासाचे नाते हरवत चालले आहे. मोबाइलच्या साहाय्याने एकमेकांविरोधात पुरावे शोधले जातात. समुपदेशानंतरही खदखद असते. कौटुंबिक कलहात ३० टक्के वादाला सध्या मोबाइल कारणीभूत आहे. हे वाद टाळण्यासाठी पती-पत्नीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे.- क्र ांती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक(अतिरिक्त कार्यभार महिला विभाग)

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाDivorceघटस्फोट