उरण : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उरण तालुक्यातील चार झेडपी मतदार संघात १२०२ तर पंचायत समितीच्या आठ मतदार संघात १९५३ अशा एकूण ३१५५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे.उरण तालुक्यात राजिपच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी निवडणूक पार पडली. निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चाणजे मतदार संघात ४०८ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. त्या पाठोपाठ जासई जि.प. मतदार संघात ३१५ आणि चिरनेर जि.प. मतदार संघात ३१० मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. तर सर्वात कमी नोटाचा वापर नवघर मतदार संघात झाला आहे. या जि.प. मतदार संघात १६९ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे.उरण पंचायत समितीच्या आठ मतदार संघात १९५३ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. यामध्ये आवरे -३४१, चाणजे - २६७, पंचायत समितीमध्ये २४६ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. या मतदार संघात शेकाप उमेदवाराचा १२८ मतांनी पराभव झाला. केगाव पंचायत समितीमध्ये १६२ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. याच मतदार संघात सेनेच्या उमेदवाराचा अवघ्या १०३ मतांनी पराभव झाला आहे. (वार्ताहर)
३१५५ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर
By admin | Published: February 26, 2017 2:58 AM