महाड : महाडमध्ये जि. प. च्या ५ जागांसाठी १५ तर पं. स. च्या १० जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात असल्याचे सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. शिवसेनेचे माजी मंत्री प्रभाकर मोरे यांची स्नुषा वृषाली मोरे यांनी विन्हेरे गटातून आपली उमेदवारी मागे घेतली. तर बिरवाडी जि.प. गटातून शिवसेनेचे माजी सरपंच माधव बागडे यांनी अपक्ष अर्ज दाखल क रून बंड केले होते. मात्र त्यांनीही उमेदवारी माघारी घेतली. जिल्हा परिषद नाते गटातून शिवसेनेच्या मैथिली खेडेकर, काँग्रेसकडून पल्लवी बागडे देशमुख, विन्हेरे जिल्हा परिषद गटातून शिवेसेनेतर्फे निकीता ताठरे, काँग्रेसकडून शुभांगी पवार, वहूर जि. प. गटातून काँग्रेसचे विद्यमान सदस्य इब्राहिम झमाने, शिवसेनेकडून जितेंद्र सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेहान देशमुख, वरंध जि. प. गटात शिवसेनेचे मनोज काळीजकर, काँग्रेसचे मनोहर रेशमी, बिरवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे संजय कचरे, काँग्रेसचे राजेंद्र खातू यांच्यात सरळ लढती देणार आहेत. (वार्ताहर)
३२ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 4:59 AM