शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्यात ६२ वर्षांत ३२ अपक्ष उमेदवारांनी लढवली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 12:09 AM

रायगड मतदारसंघ : १९७१ सालापासून अपक्ष लढवण्याची परंपरा

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकीत जिंकून येण्याची प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. मात्र, विजयी हा एकच उमेदवार होतो. काहींना निवडणूक लढवण्याची ऊर्मी असते, तर काहींना राजकीय पक्ष तिकीट नाकारतात म्हणून ते अपक्ष लढतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात १९५२ ते २०१४ सालापर्यंत एकूण ३२ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. १९७१ सालापासून अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याची परंपरा सुरू झाली होती. १९८४ साली काँग्रेससोबत फारकत घेतलेले बॅ.ए.आर.अंतुले हे एकमेव अपक्ष उमेदवार आहेत. ज्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारीमुंड्या चित करत त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

पूर्वी एका विचारधारेसाठी अथवा काही राजकीय डावपेचांसाठी अपक्षांनी निवडणूक लढल्याचा इतिहास आहे. १९५२ साली कुलाबा लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि शेकाप हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष होते. १९५७, १९६२ सालापर्यंत हीच परंपरा कायम होती. मात्र, १९६७ साली काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी जनसंघाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.

१९७१ साली अंबाजी तुकाराम पाटील यांनी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर काँग्रेसचे शंकर सावंत, शेकापचे दत्तात्रेय नारायण पाटील या प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान होेते. त्यानंतर १९७७ साली शेकाप आणि काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. १९८० सालीच्या लोकसभा निवडणुकीत रतिलाल लल्लुदास शहा यांच्या रूपाने पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार लाभला. त्या वेळी काँग्रेस, शेकाप आणि जनता पार्टी या उमेदवाराचे आव्हान होते. १९८४ साली काँग्रेसचे बॅ.ए.आर. अंतुले यांचे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत पटले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी कृष्णा गायकवाड, विलास तुपे हे अपक्ष तर काँग्रेसकडून अंबाजी पाटील आणि शेकापचे दिनकर पाटील निवडणूक लढले होते. त्यामध्ये अपक्ष असणाऱ्या बॅ.ए.आर.अंतुले यांनी सर्वच उमेदवारांना धूळ चारली होती. बॅ.अंतुले हे निवडून आलेले एकमेव अपक्ष उमेदवार ठरले होते. त्यांच्यानंतर कोणत्याच अपक्षाला निवडणूक जिंकता आलेली नाही. बॅ.अंतुले यांची राजकीय ताकद होती हे काही वेगळे सांगायची गरज नाही.

१९८९ साली विश्वनाथ बाप्पये यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर १९९१ साली सहा अपक्षांनी आपले राजकीय नशीब आजमावले होते. १९९६ साली तर अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कमाल केली. तब्बल १२ उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चक्रावून सोडले होते. १९९८ साली एक, १९९९ साली दोन, २००४ साली एकच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २००९ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर, डॉ.सिद्धार्थ पाटील, सुनील नाईक असे तीन अपक्ष उमेदवार होते.

यंदा १२ अपक्ष रिंगणातच्२०१९ सालच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १२ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.च्८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात त्यावरच अपक्ष उमेदवारांची संख्या कळणार आहे.

टॅग्स :raigad-pcरायगड