रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:46 PM2019-04-18T23:46:00+5:302019-04-18T23:46:18+5:30

रायगड जिल्ह्यात कारवाई करून तब्बल ७५ हजार लीटर्स मद्य जप्त केले असल्याची माहिती रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली आहे.

33 lakh 88 thousand seized from Raigad | रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी रायगड जिल्ह्यात कारवाई करून तब्बल ७५ हजार लीटर्स मद्य जप्त केले असल्याची माहिती रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बेकायदा दारू कारवाईचा वेग वाढविण्याचे आदेश देऊन आणि कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य प्रकारांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या काळात गावठी दारू भट्ट्या आणि वाहतुकीवर सुद्धा पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारू व साहित्य जप्त केले आहे.
>महिन्याभरात १८६ गुन्हे
गेल्या महिन्याभरात १८६ गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी ९७ जणांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या दारू हातभट्टीत २८०७ लीटर्स, देशी दारू २२७ लीटर, १९७ लीटर बीअर आणि ७० हजार ४३५ लीटर गावठी दारू रसायन यांचा समावेश आहे. ३३ लाख ८८ हजार १२३ रुपयांच्या जप्त मुद्देमालात, नऊ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ७ लाख ५६ हजार रुपये आहे. इतर मुद्देमाल व साहित्य २६ लाख ३२ हजार १२३ रुपयांचे आहे.

Web Title: 33 lakh 88 thousand seized from Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.