शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

रायगड जिल्ह्यात वर्षभरात 34 गरोदर मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:35 AM

दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश; अतिरक्तस्राव, रक्तदाब कारण

ठळक मुद्देदोन कोरोनाबाधित मातांचा समावेश; अतिरक्तस्राव, रक्तदाब कारण

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे. वर्षभरात रेफर केलेल्या केससह ३४ मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज ७ ते ९ माता प्रसूतीसाठी येतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागरूक रहावे लागते. प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव किंवा वाढत जाणारा रक्तदाब हे बऱ्याचदा माता दगावण्याचे महत्त्वाचे कारण असते. माता मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असते. प्रसूती दरम्यान रुग्णालयात आलेल्या मातेची काळजी घेतली जाते. औषधोपचाराबरोबरच २४ तास तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम सतर्क असते. त्यामुळे मातेची प्रकृती अचानक गंभीर झाली तरी योग्य व तातडीच्या उपचारामुळे  माता दगावण्याचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात कमी झाले आहे.

कोरोनामुळे दोन महिलांचे प्राण अचानक रक्तदाब वाढल्यामुळे  गेले होते. कोरोना काळात मातांना सुरक्षित ठेवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि डाॅक्टरांनी चांगले प्रयत्न केले. त्यामुळे माता दगावण्याचे प्रमाण अटोक्यात आणण्यात यश आले आहे. रायगडमध्ये ऑक्टोबर महिन्यांत सर्वाधिक कहर केला होता. त्या महिन्यात रोज २० ते २५ जणांचा मृत्यू होत होता .यावेळी सर्वाधिका धोका हा गरोदर मातांना होता. जिल्हा रुग्णालयात या मातांसाठी स्वतंत्र्य वाॅर्ड होता. या वाॅर्डमध्ये बाहेरील कोणालाही सोडले जात नव्हते. त्यामुळे मातांना संसर्ग झाला नाही. माता मृत्यूसाठी रक्तदाब सर्वांत मोठे कारण -मातेची प्रसूती होण्यापूर्वी तिचा रक्तदाब हा स्थिर असावा लागतो. अनेकदा भीतीपोटी रक्तदाब वाढतो. काही वेळा योग्य उपचार न मिळाल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे माता व बाळ दगावण्याची शक्यता असते.

महिना    एकूण    प्रसूती    सीझर           नॉर्मल    जानेवारी    २९७५    ७२०    २२५५    ०१फेब्रुवारी    २७७४    ६३०    २१४४    ००मार्च    २७१९    ६६९    २०५०    ०१एप्रिल    ३५८२    ६५२    २९३०     ०५मे    ३१९२    ९८८    २२०४    ०५जून    ३३५७    ७५४    २६०३    ०१जुलै    ३४५८    ९५६    २५०२    ०३ऑगस्ट    ३७९४    ११२२    २६७२    ०४सप्टेंबर    ४०२१    १२६५    २७५६    ०२ऑक्टोबर    ३४८६    ९४५    २५४१    ०८नोव्हेंबर    २७७१    १०४३    १७२८    ०४डिसेंबर    ४७१०    २३७२    २३३८        ०० 

टॅग्स :Raigadरायगडpregnant womanगर्भवती महिला