अलिबाग : शासनाच्या परवानगीशिवाय रायगड जिल्ह्यात एकूण ३४ अनधिकृत शाळा सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १८ शाळा पनवेल तालुक्यात आहेत. तर कर्जत व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी चार, रोहा तालुक्यात दोन तर उरण, पेण, अलिबाग व महाड तालुक्यांत प्रत्येकी एक शाळा अनधिकृत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे यांनी दिली आहे.जिल्ह्यातील या ३४ अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांकरिता प्रवेश घेऊ नये, तसेच पालकांना याबाबत जागरूक करण्याकरिता या अनधिकृत शाळांवर माहिती फलक लावण्यात येत असून, अनधिकृत शाळांच्या याद्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि काही सार्वजनिक ठिकाणी पालकांच्या माहितीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्याचेही बढे यांनी पुढे सांगितले. दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यात २३ अनधिकृत शाळा होत्या. त्यातील काही शाळांवर कारवाई करण्यात आली, तर काही शाळांच्या संचालक संस्थांना त्या स्वआर्थिक कुवतीची खातरजमा करून, संस्थेने स्वत: विद्यार्थी सुविधा देण्याची हमी शासनास दिल्यावर त्याची खातरजमा करून त्यांना शासनाच्या नियमानुसार राज्य सरकारने शाळा चालविण्याकरिता परवानगी दिल्याचे बढे यांनी सांगितले.सद्यस्थितीत जिल्ह्यात अनधिकृत असलेल्या या ३४ शाळा, नवीन शैक्षणिक वर्षी शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय, संबंधित संस्थांनी सुरू करू नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी आरटीआय-२००९ कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासन शिक्षण नियमावली २०११नुसार उचित कार्यवाही करावी, असे आदेश संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यास अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असेही बढे यांनी स्पष्ट केले आहे.पनवेल१ प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा, २ शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल आदई, ३ एस.ई.ए. अॅण्ड वुय ट्रस्ट आशा हिंदी स्कूल सुकापूर, ४ गरीराज सिंग सोलंकी पब्लिक स्कूल, लोनिवली, ५ प्लेजंट इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी अॅण्ड प्रायमरी, सांगाडे, ६ न्यू व्हिजन स्कूल आॅफ अॅकॅडमिक, पारगाव, ७ एकलव्य न्यू इंग्लिश स्कूल ओवळे, ८ लिटल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल ओवळे, ९ लेट. चांगुणाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसा. प्रायमरी स्कूल उलवा, १० आरोसे इंटरनॅशनल स्कूल, वहाळ, ११ पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कोपरा, १२ होली स्पीरिट इंग्लिश मीडियम स्कूल आपटे, १३ ह.भ.प.श्री.दामजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे, प्राथमिक इंग्लिश स्कूल कामोठे, १४ अलसफा इंग्लिश स्कूल तळोजा, १५ कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल पनवेल, १६ वेदांत पब्लिक स्कूल पनवेल कळंबोली, १७ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल, सीबीएससी, १८ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल, स्टेट बोर्ड, पनवेल.कर्जत१ सोमय्या इंग्लिश स्कूल नेरळ, २ सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल, तिवरे, ३ फैज इंग्लिश स्कूल, दामत, ४ शबनम सैय्यद इंग्लिश स्कूल, कर्जत.म्हसळा१. अल हैसान इंग्लिश स्कूल, म्हसळा, २ इकरा इस्लामिक स्कूल अॅण्ड मकतब, म्हसळा, ३ न्यू इंग्लिश स्कूल, लिपणी वावे, ४ डॉ. ए.आर.उंड्रे स्कूल, मेदडी-म्हसळा.रोहा१ रायगड एज्युकेशन सोसा. इंग्लिश मीडियम स्कूल खुटल, २ ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब.पालीरु ता गावंड संस्था लिटिल वंडर्स स्कूल परळी, पाली.उरणसेंट स्टिफन्स स्कूल, दास्तान फाटा, जासई.पेणट्री हाउस हायस्कूल, कॅनल रोड पेण.मुरु ड- मॉर्निंग स्टार प्रा. स्कूल, सर एस.ए. रोड, मुरु ड.अलिबागश्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदिर, बहिरोळे, मापगाव अलिबाग.महाडकै. सीताराम शिवराम कदम मराठी मीडियम स्कूल बिरवाडी, महाड
३४ शाळा अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:33 AM