रायगड जिल्ह्यासाठी मिळाल्या ३४ हजार ४० प्रतिबंधक लसी , ३३ हजार ५०० कोव्हिशिल्ड तर ५४० कोव्हॅक्सिन लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:25 AM2021-05-12T09:25:28+5:302021-05-12T09:25:41+5:30
सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.
अलिबाग : रायगड जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक ३४ हजार ४० लस प्राप्त झाल्या आहेत. यामधील ३३ हजार ५०० कोव्हिशिल्ड लस असून, ५४० कोव्हॅक्सिन लसी आहेत. या सर्व लसींचे लसीकरण केंद्रांत वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पेण, जुने पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १, नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ३, नवीन पनवेल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, उपजिल्हा रुग्णालय रोहा, ग्रामीण रुग्णालय महाड, ग्रामीण रुग्णालय उरण येथे लसीकरण करण्यात येत आहे. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यासह जिल्हा परिषदेची ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारित असलेल्या निवडक उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.सोमवारी जिल्ह्यासाठी ३४ हजार ४० लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ११ हजार ६०० कोव्हिशिल्ड लसींचा समावेश आहे. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसी असून, ५४० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.
सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत.