३५ गावे, ४३ वाड्यांत विंधन विहिरी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:56 AM2018-04-08T03:56:49+5:302018-04-08T03:56:49+5:30
कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- विजय मांडे
कर्जत : कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या विंधन विहिरींच्या कामांना कधी सुरुवात होणार, याकडे पाणीटंचाईग्रस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुका पाणीटंचाई कृती आराखडा २०१८चा अहवाल आमदार सुरेश लाड, तालुका पंचायत समितीचे सभापती प्रदीप ठाकरे, तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे यांनी तयार केला आहे. दरवर्षी ज्या भागात पाणीटंचाई जाणवते, त्या गावात आणि आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ५० हजार रु पयांची तरतूद विंधन विहीर खोदण्यासाठी ठेवण्यात आली आहे.
तालुक्यात ७८ गावे-वाड्यांत या विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्या विंधन विहिरी खोदण्याआधी जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी विहीर मंजूर असलेल्या जागेची पाहणी करणार आहेत. मात्र, त्या सर्व ७८ ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट पार करण्याची जबाबदारी लघुपाटबंधारे विभागावर असून, पावसाळ्यापूर्वी मंजूर गावात-वाड्यांत विंधन विहिरी खोदाव्या लागणार आहेत. कारण पावसाळ्यानंतर विंधन विहीर खोदण्याचा कार्यक्र म या आर्थिक वर्षासाठी बंद होतो.
कळंब गावठाण, कुंडलज, जांभिवली, अंथराट वरेडी, बोरगाव, आर्डे, पाली गाव, नेवाळी- वाकस, कडाव, सावळे, किकवी, हेदवली, आषाणे, मोग्रज, पोसरी, माणगाव-खांडपे, मुळगाव, कोंडीवडे, नांगुर्ले, चई, उंबरखांड, नांदगाव, मोहपाडा, चेवणे, कशेळे, मांडवणे, सांगवी, नेवाळी-बीड, आवळस, बीड, बोरीवली, दामत, ममदापूर, शेलू या गावांत नवीन विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत.
आदिवासीवाड्यांत झुगरेवाडी, दिवाळवाडी, नंदकरपाडा, टाकाचीवाडी-भडवळ, खांडसवाडी, वेणगाव, भडवळ-कातकरीवाडी, डोणेवाडी, नवसुचीवाडी, चिमटेवाडी, भोपळेवाडी, आधारवाडी-शेलू, बौद्धवाडी-शेलू, गरु डपाडा, बेकरेवाडी, वरईवाडी मानकिवली, जांभूळवाडी-मोग्रज, आनंदवाडी, कशेळे-कातकरीवाडी, कराळेवाडी-धनगरवाडा, पोटल-कातकरीवाडी, आंबोट-कोळंबेवाडी, भागूचीवाडी-कळंब, चाहुचीवाडी, माणगाव-ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, मुंडेवाडी-बीड, ममदापूरवाडी, तिघर-धनगरवाडी, भडवळ-धनगरवाडा, चोची-आदिवासीवाडी, धोत्रेवाडी, खरबाचीवाडी आदी वाड्यांत विहिरी खोदल्या जाणार आहेत.