शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

३५ गावे, ४३ वाड्यांत विंधन विहिरी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 3:56 AM

कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

- विजय मांडेकर्जत : कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या विंधन विहिरींच्या कामांना कधी सुरुवात होणार, याकडे पाणीटंचाईग्रस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.तालुका पाणीटंचाई कृती आराखडा २०१८चा अहवाल आमदार सुरेश लाड, तालुका पंचायत समितीचे सभापती प्रदीप ठाकरे, तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे यांनी तयार केला आहे. दरवर्षी ज्या भागात पाणीटंचाई जाणवते, त्या गावात आणि आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ५० हजार रु पयांची तरतूद विंधन विहीर खोदण्यासाठी ठेवण्यात आली आहे.तालुक्यात ७८ गावे-वाड्यांत या विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत. त्या विंधन विहिरी खोदण्याआधी जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी विहीर मंजूर असलेल्या जागेची पाहणी करणार आहेत. मात्र, त्या सर्व ७८ ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट पार करण्याची जबाबदारी लघुपाटबंधारे विभागावर असून, पावसाळ्यापूर्वी मंजूर गावात-वाड्यांत विंधन विहिरी खोदाव्या लागणार आहेत. कारण पावसाळ्यानंतर विंधन विहीर खोदण्याचा कार्यक्र म या आर्थिक वर्षासाठी बंद होतो.कळंब गावठाण, कुंडलज, जांभिवली, अंथराट वरेडी, बोरगाव, आर्डे, पाली गाव, नेवाळी- वाकस, कडाव, सावळे, किकवी, हेदवली, आषाणे, मोग्रज, पोसरी, माणगाव-खांडपे, मुळगाव, कोंडीवडे, नांगुर्ले, चई, उंबरखांड, नांदगाव, मोहपाडा, चेवणे, कशेळे, मांडवणे, सांगवी, नेवाळी-बीड, आवळस, बीड, बोरीवली, दामत, ममदापूर, शेलू या गावांत नवीन विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत.आदिवासीवाड्यांत झुगरेवाडी, दिवाळवाडी, नंदकरपाडा, टाकाचीवाडी-भडवळ, खांडसवाडी, वेणगाव, भडवळ-कातकरीवाडी, डोणेवाडी, नवसुचीवाडी, चिमटेवाडी, भोपळेवाडी, आधारवाडी-शेलू, बौद्धवाडी-शेलू, गरु डपाडा, बेकरेवाडी, वरईवाडी मानकिवली, जांभूळवाडी-मोग्रज, आनंदवाडी, कशेळे-कातकरीवाडी, कराळेवाडी-धनगरवाडा, पोटल-कातकरीवाडी, आंबोट-कोळंबेवाडी, भागूचीवाडी-कळंब, चाहुचीवाडी, माणगाव-ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, मुंडेवाडी-बीड, ममदापूरवाडी, तिघर-धनगरवाडी, भडवळ-धनगरवाडा, चोची-आदिवासीवाडी, धोत्रेवाडी, खरबाचीवाडी आदी वाड्यांत विहिरी खोदल्या जाणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड