छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्र माने पुनीत झालेल्या किल्ले प्रतापगडावर बुधवारी चतुर्थीच्या दिवशी भवानी माता मंदिराला ३५६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य३५६ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्र माचे आयोजन प्रतापगडचे भूमिपुत्र आप्पा उतेकर यांनी के ले होते. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त प्रतापगडावर उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात स्वराज्य ढोल पथकाच्या ठेक्यावर झाली. सुमारे दोन तास लयबद्ध स्वरात चाललेले ढोल ताशा समूह वादन ऐकून अवघा शिवभक्त मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरातून दीप प्रज्वलित करून मशाली प्रकाशमान केल्या. यावेळी आप्पा उतेकर यांच्यासह राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, संतोष जाधव, नीलेश अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मशाली घेवून मावळे शिवप्रताप बुरुजाकडे सरसावले, संपूर्ण तटबंदीला लावलेल्या मशाली पेटविण्यात आल्या. गडाने जरी धुक्याची चादर पांघरली असली तरी ३५६ मशालीच्या उजेडात संपूर्ण प्रतापगड उजळून निघाला. किल्ले प्रतापगडावरील जगदंबेच्या मंदिरास २०१० साली ३५० वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधून या मशाल महोत्सवाची सुरु वात छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ही संकल्पना शिवभक्त आप्पा उतेकर यांची होती. यंदा या कार्यक्र माचे सातवे वर्ष. गडावर पावसाचे सावट असूनही असंख्य शिवभक्तांनी गर्दी केली होती.
३५६ मशालींच्या प्रकाशात उजळला प्रतापगड
By admin | Published: October 07, 2016 5:28 AM