पनवेल शहरात 36 तासांचा शटडाऊन; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
By वैभव गायकर | Published: October 8, 2023 08:54 PM2023-10-08T20:54:46+5:302023-10-08T20:55:21+5:30
९ ते १० ऑक्टोबर दरम्यान ३ झोनमध्ये पाणीपुरवठा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल शहरात महानगर पालिकेच्या वतीने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मंगळवार, १० ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३६ तासांचा शटडाऊन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पुकारण्यात आला आहे. याकरिता पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे झोननिहाय पाणीपुरवठा शहरात करण्यात येणार आहे.
- झोन 1 यामध्ये ९ तारखेला हरिओम नगर उंच जलकुंभ, एचओसी कॉलनी जलकुंभ, पटेल मोहल्ला उंच जलकुंभ, सर्व्हिस हौद गोल टाकी उंच जलकुंभ आदी ठिकाणी पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
- झोन 2 मध्ये ठाणा नाका जलकुंभ, गंगाराम सिनेमा जलकुंभ सर्व्हिस हौद चौकी या ठिकाणी पाणीपुरवठा सुरु राहणार आहे.
- झोन 3 मध्ये मार्केट यार्ड येथून होणार पाणीपुरवठा ९ ते १० ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. धाकटा खांदा वरची आळी या भागातील पाणीपुरवठा ९ तारखेला बंद राहणार आहे.
शटडाऊन नंतर शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय जगताप यांनी दिली.