अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अनेक विभागात सुरू असलेला पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये २० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.पेण तालुक्यात सर्वाधिक २१ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्ह्यात कर्जत, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कर्जत तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्या, पेणमध्ये २१ गावे आणि ६५ वाड्या, रोहा तालुक्यात २ वाड्या, माणगावमध्ये २ वाड्या, महाडमध्ये २ गावे आणि १७ वाड्या पाणीटंचाईच्या छळा सोसत आहेत. तर पोलादपूर तालुक्यात १० गावे आणि ७१ वाड्या, श्रीवर्धनमधील ४ वाड्या अशी एकूण ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई आहे.यावर्षी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला होता. त्यात ५०८ गावे आणि १ हजार ३०२ वाड्यांचा समावेश आहे. ८ कोटी ६२ लाख रु पयांचा हा आराखडा आहे. यातून ३१५ गावे आणि ७८५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा अपेक्षित आहे. ७४ गावे आणि २२१ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
३६ गावे, १६५ वाड्यांसाठी २० टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 3:14 AM