शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

महाडमध्ये ३७ अंगणवाड्यांना फटका; चक्रीवादळाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:37 PM

अंदाजे ४० लाखांच्या निधीची आवश्यकता

- सिकंदर अनवारेदासगाव : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका शासकीय अंगणवाड्यांनाही बसला असून महाड तालुक्यातील ३७ अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास विभागाकडून पाठवण्यात आले आहेत.संपूर्ण कोकणात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. नैसर्गिक हानीबरोबर घरांचे आणि शासकीय इमारतींचेदेखील नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांनाही फटका बसला असून तालुक्यातील जवळपास ३७ अंगणवाड्यांचे छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. यामुळे अंगणवाड्यांतील शैक्षणिक आणि सकस आहाराचेही नुकसान झाले आहे. या अंगणवाड्या गावाच्या शेजारी किंवा गावात असल्याने वाऱ्याच्या वेगाने छप्पर उडून गेले आहेत. या अंगणवाड्या सध्या बंद आहेत. मात्र भविष्यात अंगणवाड्या सुरू झाल्या तर बालकांना कुठे बसवायचे, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. महाडमधील चिंभावे मोहल्ला, आचलोळी, पुनाडे, कोंडराण, वाघोली, वरांडोली, कोंझर, तळोशी, आढी, रावतली, आंबवडे, नाते बौद्धवाडी, वहूर उगवतवाडी, विन्हेरे पारदुलेवाडी, केंबुर्ली, बिजघर, वालसुरे, वाघेरी, शिरसवने, शेंदूरमलई, ताम्हाणे, वसाप, उगवतकोंड, पांगारी, कुंभार्डे आदिवासी वाडी, घावरेकोंड, बेबलघर, कोथुर्डे, कोथुर्डे सोंडेवाडी, चापगाव, निजामपूर, सोनघर, वीर टेंबेवाडी, वीर गोठलवाडी, वीर, कोथुर्डे सोनारवाडी, नांदगाव बु. या गावांतील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी दिली.इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठवला प्रस्तावमहाड तालुक्यातील अनेक अंगणवाड्या यापूर्वीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय काही गावांत स्वत:च्या इमारती नसल्याने गावातील सार्वजनिक किंवा खासगी इमारतीमध्ये अंगणवाड्या सुरू आहेत.नवीन इमारती मिळाव्या म्हणून प्रस्ताव खितपत पडून असतानाच निसर्ग चक्रीवादळाने अवकृपा दाखवत अंगणवाड्यांचेदेखील नुकसान केले आहे. अंगणवाड्या दुरुस्त करण्याबाबत पंचनामे करून जवळपास ४० लाखांचा निधी आवश्यक आहे.याबाबतचा प्रस्तावही जिल्हा एकात्मिक बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र राज्यातील एकूण स्थिती आणि कोकणातील नुकसान पाहता या नुकसानग्रस्त अंगणवाड्यांना कधी निधी मिळेल हा एक प्रश्नच आहे.मात्र भविष्यात बालकांना अंगणवाडीविना बसावे लागणार असे चिन्ह निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात ३७ अंगणवाड्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त झाल्या असून दुरुस्तीबाबत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेश्री बने यांनी सांगितले