अलिबाग - अंगाला झोबणारा गारठा, अपरिचित ठिकाण ,स्पर्धकांची मोठी संख्या, या कशाचीही पवार् न करता मैदान मारायचेच, या उद्देशाने मंगळवारी पहाटे पाचवाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर युवक-युवती पुर्ण तयारीनिशी सज्ज होते. निमित्य होते ते जिल्हा पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या रिक्त पदाच्या भरतीचे. मंगळवारपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी चालकपदासाठीची मैदानी चाचणी घेण्यात आली.
बुधवारी कॉन्स्टेबलच्या पदासाठी शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या प्रवगार्त २७२ जागा भरावयाच्या असून १९ हजार १७६ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी १२०० जणांची उद्या चाचणी घेण्यात येणार आहे, पोलीस दलात चालकाची ६ पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी एकुण ६४७ जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी ३७७ जणांनी हजेरी लावली. त्यामध्ये ९ मुली होत्या.
देशातील 'या' महामार्गावर फक्त इलेक्ट्रिक वाहनेच धावणार! जाणून घ्या कुठून सुरू होणार
भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मैदानावर विभागनिहाय विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी सहाच्या सुमारास सुरवातीला उमेदवारांची बायोमेट्रीक पडताळणी घेऊन पुरुष गटातील उमेदवारांची उंची व छाती तपासली जात होती, त्यामध्ये मात्र ठरलेल्यांना धावणे व गोळाफेकच्या प्रकारासाठी प्रवेश देण्यात येत होता. एकावेळी १० -१० उमेदवारांचा गट बनवून क्रमाक्रमाने त्यांची चाचणी घेतली जात होती. त्यामुळे भरतीच्या ठिकाणी कसलाही गोंधळ,गडबड झाली नाही. भरतीसाठी ५३ अधिकाऱ्यांसह ३६७ अंमलदार व २७ मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले असून पुर्ण प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घागेर् व अप्पर अधीक्षक अतुल झेंडे हे देखरेख ठेवून होते.चालकपदासाठी पुरुष गटात १६०० मीटर धावणे व गोळाफेक तर महिलांसाठी ८ मीटर धावणे आणि गोळाफेक हा प्रकार होता. दोन्ही गटासाठी अनुक्रमे ३० व २० गुण होते. तर वाहन चालविण्याबाबतचे कौशल्यासाठी ३० गुण असून त्यासाठीची परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे.भरतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील युवक-युवती सहभागी आहेत. बाहेरच्या जिल्हा, तालुक्यातील बहुतांश उमेदवार आपल्यासोबत वडील, मोठा भाऊ किंवा नातेवाईकांना घेवून आले आहेत. पोलीस दलातफेर् उमेदवारांना कुरुळ येथील क्षात्रक्य समाज हॉलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या सोबत आलेल्यांना उद्यान किंवा समुद्र किनाऱ्याचा आसरा घ्यावा लागला.
पहाटे पाच वाजल्या पासून आम्ही ग्राऊंडवर होतो. दुपारी माझा नंबर आला. आम्हाला १०जणांच्या ग्रुप करून आमची मैदानी परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांसाठी केळी, बिस्किट पुरविण्यात आले होते.तसेच अन्य आवश्यक सुविधाही उपलब्ध करुन दिल्याने कसलीही अडचण जाणवली नाही.
- योगेश भगवान निरगुडे (खोपोली)