शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

३७वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम; भूचुंबकीय वेधशाळा प्रमुख पात्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:58 AM

२१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.

- जयंत धुळपअलिबाग : पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे. २१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित ‘अंटार्क्टिका’ खंडावरील ‘मैत्री स्टेशन’ या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच खंडावरील भारत सरकारच्या ‘भारती स्टेशन’या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणेकर यांची तर उपप्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या उर्वरित १७ संशोधकांच्या चमूमध्ये डॉ. नरेंद्र सिंग रावत (भाभा अ‍ॅटोमिक रीसर्च सेंटर), डॉ. सुकुमार भक्ता (बॉटेनिकल सर्व्हे आॅफ इंडिया), अमित रावुतेला (डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅप्लिकेशन लॅबोरेटर), इलेक्टॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे एम. श्रीधर, अब्दुल हाय नोमान, ईश्वर राव, जी. नागाराजू, जी. लक्ष्मी नारायण रेड्डी, एस. राजू बाबू, राजेश कुमार तित्ला, सोमा राजू सोंगा, एस. सुधाकर, जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे प्रदीप कुमार, मोहमद सादिक, दीपक युवराज गजभिये, झाहीद हाबीब आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिजेसचे संशोधक डॉ. अश्विन अशोक राऊत यांचा समावेश आहे.अंटार्क्टिका खंडावरील भारतीय वैज्ञानिक मोहिमांचे आयोजन गोवास्थित नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अ‍ॅण्ड ओशन रीसर्च या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते.या ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेत भूचुंबकीय शास्त्र, अणू व अणुशक्ती, वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणी व प्राणिजन्य व्याधीविषयक संशोधन होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड