38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय

By वैभव गायकर | Published: October 2, 2023 07:14 PM2023-10-02T19:14:30+5:302023-10-02T19:15:00+5:30

रेल्वेने हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा ब्लॉक पुढे वाढविण्यात आला.

38-hour megablock at 43 hours; Inconvenience to commuters due to extension of mega block time on Harbor route | 38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय

38 तासांचा मेगाब्लॉक 43 तासांवर; हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची वेळ वाढविल्याने प्रवाशांची गैरसोय

googlenewsNext

वैभव गायकर

पनवेलशनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते बेलापूर वाहतूक 38 तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.मात्र हा मेगाब्लॉक पुढे 43 तासांवर गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मेगाब्लॉक 1 वाजेपर्यंत संपेल या भावनेने पनवेल रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांना माघारी फिरत पुन्हा खाजगी वाहतूकीचा पर्याय निवडावा लागला.

1 वाजल्यापासून प्रवाशांना एक तासात वाहतूक सुरळीत होईल असे आश्वासन दिले जात होते मात्र पुढे 1 ऐवजी सहा वाजले तरी वाहतूक सुरळीत झाली नव्हती. सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने नेहमी पेक्षा कमी गर्दी प्रवाशांची होती.मात्र मेगाब्लॉक संपलेले असेल या भावनेने रेल्वे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना स्थानकात ताटकळत उभे रहावे लागले. पनवेल वरून सीएसटी,वाशी,बेलापुर,अंधेरी आदी ठिकाणी लोकल धावत असते. रेल्वेने हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने हा ब्लॉक पुढे वाढविण्यात आला.

Web Title: 38-hour megablock at 43 hours; Inconvenience to commuters due to extension of mega block time on Harbor route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.