रायगडमध्ये ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:04 AM2019-07-30T01:04:13+5:302019-07-30T01:04:17+5:30

रायगड पोलीस अधीक्षकांचे आदेश

4 police officers transferred in Raigad | रायगडमध्ये ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रायगडमध्ये ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

अलिबाग : रायगड पोलीस दलातील तब्बल ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी शुक्रवारी हे आदेश काढले आहेत.

पोलीस विभागातील सकारात्मकता वाढावी, याकरिता ११ पोलीस निरीक्षक, १९ सहायक पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाणे तसेच शाखानिहाय उपलब्ध; तसेच रिक्त जागांचा विचार करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांना तणावमुक्त वातावरणात कामकाज करता यावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक एस. एन. गव्हारे यांची सुरक्षा शाखा, एस. एल. पाटील जिल्हा विशेष शाखा, म्हसळा पोलीस स्टेशनला पी. एन. कांबळे, आर. एम. परदेशी महाड तालुका, एच. आर. डनगरे कंट्रोल रूम अलिबाग, डी. बी. क्षीरसागर रोहा, एस. जी. गेंगाजे तळा, अरुण भोर कर्जत तर महिला पोलीस निरीक्षक एस. जी. तानवडे यांची रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. खालापूर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांची बदली दिघी सागरी येथे प्रभारी अधिकारी म्हणून झाली आहे. तर दिघी येथील प्रभारी अधिकारी धर्मराज सोनके यांची बदली मांडवा सागरी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून झाली आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी असलेले सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची बदली श्रीवर्धन येथे करण्यात आली आहे. पी. ए. पवार यांची दादर सागरी पोलीस ठाण्यात, पी. एस. गिरी यांची महाड एमआयडीसी येथे, पी. आर. जाधव यांची पोलादपूर येथे, व्ही. आर. तांबोळी मुरु ड येथे, पी. टी. काळे माथेरान येथे, सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. पाटील यांची नेरळ येथे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: 4 police officers transferred in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.