पेणमध्ये ४० कोटींची उलाढाल

By admin | Published: September 14, 2015 04:09 AM2015-09-14T04:09:21+5:302015-09-14T04:09:21+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६० ते ७० च्या दशकापर्यंत पेण शहर आणि ग्रामीण परिसरातील कार्यशाळा नावाजलेल्या मूर्तिकारांच्या एकापेक्षा एक सरस अशा गणेशमूर्तींसह इतर देवादिकांच्या

40 crore turnover in pen | पेणमध्ये ४० कोटींची उलाढाल

पेणमध्ये ४० कोटींची उलाढाल

Next

पेण : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १९६० ते ७० च्या दशकापर्यंत पेण शहर आणि ग्रामीण परिसरातील कार्यशाळा नावाजलेल्या मूर्तिकारांच्या एकापेक्षा एक सरस अशा गणेशमूर्तींसह इतर देवादिकांच्या मूर्तीही येथे तयार केल्या जातात. आता त्या दशकातील मूर्तिकारांची पिढी जावून त्या पिढीचा वारसा त्यांच्या नंतरच्या दोन पिढ्यांनी सांभाळला आहे. १९८५ नंतर पेणच्या गणेशमूर्तिकलेने देश-विदेशात आपली कला नावारुपास आणली. सध्या या व्यवसायात पदवीप्राप्त शिक्षण घेतलेले तब्बल २०० ते २५० मूर्तिकार व्यावसायिक ग्रामीण भागात हा व्यवसाय सांभाळत असून वर्षभर चालणाऱ्या या मूर्तिकलेने महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. ३५ ते ४० कोटींच्या घरात गणेशमूर्तिकारांचा व्यवसाय असून पेणमधील तब्बल १५ ते २० हजार स्थानिकांना रोजगार मिळतो.
हमरापूर, जोहे, कळवे, दादर, तांबडशेत येथील नव्या पिढीतील तरुणांनी १९९० नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीस नोकऱ्यांच्या पाठीमागे न लागता मूर्तिकलेने प्रावीण्य संपादन केले. गेल्या दोन शतकात या परिसरात घरोघरी कार्यशाळा निर्माण झाल्यात. या पदवीधर तरुणांची पाचवी पिढी या व्यवसायात रुजू झाली असून वर्षाच्या दहा महिने मूर्तिकलेचा हा व्यवसाय परिसरात सुरु असतो. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या कच्च्या गणेशमूर्तीसह रंगकाम केलेल्या गणेशमूर्ती अशी वर्षभराची व्यूहरचना असून आलेल्या आॅर्डर वेळेत पोहचविण्यावर या कार्यशाळेचा भर असतो. स्थानिक गावकरी कुशल, अकुशल कारागिरांना वर्षभर रोजगार व घरची भातशेती, भाजीपाला शेती पिकवून हमरापूर-जोहे कलाग्राम चांगली आर्थिक उन्नती करीत आहेत. हमरापूर गणेशमूर्तिकार संघटनेच्या ११६ कार्यशाळा व जोहे-कळवे मूर्तिकार संघटनेच्या २४० कार्यशाळा अशा एकूण ३५६ कार्यशाळांचे साम्राज्य या कलाग्राम परिसरात आहे. जोहे संघटनेचे अध्यक्ष शंकर मोकल, हमरापूर संघटनेचे अध्यक्ष संदेश कदम, कळवे संघटना अध्यक्ष प्रदीप पाटील या विभागीय अध्यक्षांनी एकत्रित जोहे-हमरापूर गणेशमूर्ती संघटना स्थापन केली आहे. या व्यतिरिक्त दरवर्षी नव्याने होणाऱ्या कार्यशाळा पकडून ही संख्या ४०० ते ४५० च्या आसपास जाते.
वाशी-वडखळ विभागातील बोर्झे, दिन, कणे, वाशी, वढाव या वाशी विभागातील शिर्की-मसद, बोटी, सिंगणवड, वडखळ, गडब या गावातील पारंपरिक मूर्तिकार व त्यांच्या वारसांचा हा पिढीजात व्यवसाय. गावातील गणेशभक्तांची पूर्वापार चालत आलेली आॅर्डर याशिवाय मुंबई, ठाणे, वसई, बोरिवली, दादर, भुलेश्वर या ठिकाणी बाप्पाच्या उत्सवापूर्वी चार दिवस अगोदर हे मूर्तिकार गणेशमूर्ती घेवून मुंबई व उपनगराचा बाजार करायचे. मात्र यावर बंदी आल्याने काही मूर्तिकार महिनाभरासाठी गाळा घेवून गणेशमूर्तीची विक्री करतात.
पेण शहरातील तब्बल ३०० कार्यशाळा व ग्रामीण परिसरातील ४५० ते ५०० कार्यशाळांमध्ये वर्षभरात १८ ते २० लाख गणेशमूर्ती निर्मिती होते. यावर्षी गणेशोत्सवासाठी ८०० कार्यशाळांमध्ये तब्बल २५ लाख गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली.

Web Title: 40 crore turnover in pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.