उरण किनाऱ्यावर आढळला ४० फुटीे मृत देवमासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:41 AM2018-06-15T06:41:22+5:302018-06-15T06:41:22+5:30
रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथमिक कयास आहे.
उरण : रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथमिक कयास आहे. या देवमाशाचे वजन सुमारे २० टन आहे.
गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गावातील मच्छिमारांना किना-यावर बांधलेल्या दगडी बांधावर देवमाशाचा हा मृतदेह आढळला. तो सडलेल्या अवस्थेत होता व त्याची अनेक हाडेही शरीरातून बाहेर येऊन उघडी पडलेली होती. हा देवमासा काही दिवसांपूर्वी समुद्रातच मरण पावला असावा व भरतीच्या लाटांनी तो वाहत किनाºयावर आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राच्या किनाºयावर वाहून आलेला हा आठवा मृत देवमासा आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी ४० वर्षांपूर्वी सन १९७८ मध्ये एक ४८ फुटी मेलेला देवमासा उरणच्या किनाºयावर वाहून आला होता, अशी आठवण तुकाराम कोळी या स्थानिक मच्छिमाराने यावेळी करून दिली. आढळलेल्या माशाची ओळख पटविण्यासाठी वन विभागाच्या अधिकाºयांनी तपासणीसाठी त्याचे ‘टिश्यू’ काढून घेतले. सडलेल्या अवस्थेतील हा मासा तेथून हलविणे शक्य नसल्यामुळे नंतर तो तेथेच पुरण्यात येणार होता.
किनाºयावरील कांदळवनांची जबाबदारी असलेल्या ‘मॅन्ग्रो सेल’चे काम पाहणारे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन म्हणाले की, बाह्यरूपावरून तरी हा ‘ब्ल्यू व्हेल’ असावा, असे वाटते.‘टिश्यू’च्या तपासणीनंतर नक्की प्रजाती कळू शकेल.
आजार झाल्याने, म्हातारपणामुळे, समुद्रात एखाद्या जहाजाची धडक बसल्याने अशा एखाद्या संभाव्य कारणाने त्याचा मृत्यू झालेला असू शकेल, असेही ते म्हणाले.
सर्वात मोठा सजीव
‘ब्ल्यू व्हेल’ प्रजातीचा देवमासा हा पृथ्वीवर उत्क्रांत झालेला सर्वांत मोठा सजीव मानला जातो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन आॅफ नेचर’ने या प्रजातीचा समावेश विलुप्ततेचा धोका असलेल्या प्राण्यांच्या ‘लाल यादी’त केलेला आहे. भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसारही ही प्रजाती संरक्षित यादीत आहे.