उरणमध्ये भर पावसात ४०९६ गौरी-गणपतींचे विसर्जन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 05:37 PM2023-09-23T17:37:10+5:302023-09-23T17:37:38+5:30

उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४०९६ गौरी -गणपतींना शनिवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

4096 Immersion of Gauri-Ganpati in heavy rain in Uran | उरणमध्ये भर पावसात ४०९६ गौरी-गणपतींचे विसर्जन 

उरणमध्ये भर पावसात ४०९६ गौरी-गणपतींचे विसर्जन 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४०९६ गौरी -गणपतींना शनिवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४ सार्वजनिक, २०३० घरगुती गणपती आणि १०० गौरींचे,  न्हावा-शेवा बंदर ठाण्याच्या हद्दीतील १० सार्वजनिक, १३९९ घरगुती गणपती,१९६ गौरी आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६४० घरगुती,२० गौरी अशा एकूण उरण परिसरात तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४०९६ गौरी -गणपतींचे शनिवारी विसर्जन करण्यात आले.यामध्ये १२ सार्वजनिक, घरगुती-४०६८ गणपती तर ३१६ गौरींचा समावेश आहे.

गौरी-गणपतींच्या विसर्जनाला शनिवारी मुसळधार कोसळणाऱ्या पावसातच दुपारपासूनच मिरवणुकीने नाचत वाजतगाजत सुरुवात झाली होती. घारापुरी, मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा, माणकटोक, न्हावा-खाडी आदी समुद्र- खाड्या किनारी आणि शहरातील विमला,भवरा तसेच तालुक्यातील विविध गावातील तलावात भावपूर्ण वातावरणात शांततेत विसर्जन करण्यात आले. 

यावेळी न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, दिपक इंगोले, संजीव धुमाळ यांच्यासह चार पोलिस निरीक्षक,१८ उपनिरीक्षक आणि १३५ पोलिस कर्मचारीही चोख बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.त्याशिवाय फिरत्या मोबाईल बंदोबस्तासाठी २० कर्मचाऱ्यांचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: 4096 Immersion of Gauri-Ganpati in heavy rain in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.