सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 08:17 AM2024-04-19T08:17:42+5:302024-04-19T08:19:14+5:30

सुनील तटकरेंची संपत्तीत ५ वर्षांत ४१ लाखांची वाढ; जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

41 lakhs increase in Sunil Tatkare's wealth in 5 years Movable, Immovable Assets 8 crore 62 lakh 93 thousand 866 rs | सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

सुनील तटकरेंची संपत्ती ५ वर्षांत किती वाढली? जंगम, स्थावर मालमत्ता ८,६२,९३,८६६ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी स्वत:चे चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्याकडे दाखल केले. ते दाखल करताना त्यांनी शपथपत्रात जंगम आणि स्थावर मालमत्ता ८ कोटी ६२ लाख ९३ हजार ८६६ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तर, पत्नी वरदा तटकरे यांच्या नावे ५ कोटी ९४ लाख ७४ हजार ९०७ एवढी जाहीर केली आहे. पाच वर्षांत सुनील तटकरे यांच्या संपत्तीत ४१ लाख ६२ हजार ३६३ रुपयांची वाढ झाली.

तटकरे यांच्या पत्नीच्या संपत्तीत १ कोटी ४१ लाख १९ हजार १३३ रुपयांनी वाढ झाली आहे. तटकरे यांच्या नावावर १ लाख १४ हजार ५२० रुपये कर्ज असून, एकही गुन्हा, खटला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. तटकरे यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

२०१९च्या निवडणुकीत
याआधीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम आणि स्थावर मालमत्ता ८ कोटी २१ लाख ३१ हजार ५०३ रुपयांची असल्याचे जाहीर केले होते. तर, पत्नी वरदा तटकरे यांची ४ कोटी ५३ लाख ५५ हजार ७७४ एवढी जाहीर केली होती. 

सद्य:स्थितीत  
- तटकरे यांच्याकडे २ लाख ७१ हजार ५४५ रोख रक्कम आहे. पत्नी वरदा तटकरे यांच्या नावावर १ कोटी २२ लाख ५७ हजार ५१० जंगम तर ४ कोटी ७२ लाख १७ हजार ३९७ रुपये स्थावर मालमत्ता अशी ५ कोटी ९४ लाख ७४ हजार ९०७ रुपये मालमत्ता प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे. 
- वरदा तटकरे यांच्या हातात ४ लाख ५८ हजार २८१ रुपये रोख रक्कम आहे. तटकरे यांच्या नावावर एक इनोव्हा क्रेटा हे वाहन आहे. १ लाख १४ हजार ५२० रुपये कर्ज आहे.

Web Title: 41 lakhs increase in Sunil Tatkare's wealth in 5 years Movable, Immovable Assets 8 crore 62 lakh 93 thousand 866 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.