शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कर्जतमध्ये ३४ गावे, ५३ वाड्यांत टंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:16 AM

तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत

संजय गायकवाड  कर्जत : तालुक्याच्या दुर्गम भागात तसेच आदिवासी परिसरात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून ३४ गावे आणि ५३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून टँकर सुरू करण्याचे नियोजन केले आहे असून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी तोपर्यंत करायचे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्जत हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींचे पाणी तळ गाठतात. परिणामी नळपाणी योजना मोडकळीस येतात. त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी काही मैल वणवण करावी लागते. अशा भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने बैलगाडी किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला आहे. आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती अमर मिसाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता कांबळे आणि गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यात तालुक्यातील ३४ गावे आणि ५३ वाड्या अशा ८७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ४३ लाख रु पयांची तरतूद करून ठेवली आहे.शासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवण्याचे नियोजन केले आहे, पण हे नियोजन १ एप्रिलपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होईपर्यंतचे आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचविण्यात शासनाचे नियम अडथळे बनत आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील रहिवाशांना आणि मुख्य म्हणजे महिलांना आतापासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेला नियम पुढे करून टँकर एप्रिल महिन्यात सुरू केले जातील, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.