मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईतील उपाहारगृह, मॉल्सची झाडाझडती घेतली. नियमांचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणाऱ्या काही उपहारगृहांना टाळेही ठोकण्यात आले. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील या सर्वेक्षणात आग प्रतिबंधक कायद्याचे नियम न पाळण्याचे प्रमाण ४५ टक्के असल्याचे आढळून आले.
कमला मिल कंपाउंड येथील मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टो-पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या रेस्टो पबमध्ये आगशी खेळ सुरू होता, असे चौकशीतून समोर आल्यानंतर, पालिकेने मुंबईतील सर्व उपाहारगृहे, मॉल्स, मल्टिप्लेक्सची कसून तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाºया उपाहारगृहांना नोटीस बजाविण्यात वेळ न घालविता, तेथेच सील करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली होती. कारवार्इंनंतरही उपाहारगृहे, मॉल्सध्ये नियमांचे उल्लंघन, अग्निरोधक यंत्रणा निकामी असणे, अशा पद्धतीने ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरू आहेत. वारंवार नोटीस पाठवूनही मुंबईत दररोज सरासरी १३ आगीच्या घटना घडत आहेत. निष्पाप जिवांचा बळी जात आहे. बडगा दाखवूनही निम्मी उपाहारगृह नियम पालन करीत असतील, अशी नाराजी अग्निशमन दलातील अधिकाºयाने व्यक्त केली.अन्यथा खटला दाखल होणारनोटीस पाठवूनही आगीपासून सुरक्षित न करणाºया इमारतींवर खटला दाखल करण्याचे अधिकार पालिकेला आहेत.मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये आगीच्या दुर्घटनेचे प्रमाण दररोज सरासरी १३ एवढे होते.३८० उपाहारगृहे जमीनदोस्तजानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये महापालिकेने केलेल्या पाहणीत तीन हजार २६४ पैकी १,५०० ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उजेडात आले. गेल्या सात महिन्यांत महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी ३८० उपाहारगृह जमीनदोस्त केली, तर ३६ सील करण्यात आली आहेत.अचानक टाकणार धाडसध्या निवासी इमारतींमधील रहिवाशांनी फायर सेफ्टी आॅडिट करून, त्याचा अहवाल अग्निशमन दलाकडे पाठविणे अपेक्षित आहे. नवीन परिपत्रकानुसार मुंबईतील इमारतींची वर्गवारी त्यांच्या उंचीनुसार करण्यात आली आहे. उत्तुंग इमारतींची पाहणी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहे. या अधिकाºयांनी इमारतींना नोटीस न पाठविता, अचानक धाड टाकून पाहणी करणे अपेक्षित आहे.दर महिन्याला ३०० इमारतींचे लक्ष्यपरळ येथील क्रिस्टल टॉवर येथील इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर महापालिकेने पुन्हा एकदा मुंबई सर्व इमारतींमध्ये अचानक धाड टाकून पाहणी करणार आहे. या पाहणीसाठी नियुक्त विशेष कक्षाला जुलै महिन्यातच परिपत्रकाद्वारे प्रत्येक महिन्यात तीनशे इमारतींची तपासणी करण्यास सांगण्यात आले होते.परवाना रद्द होणारबºयाच उपाहारगृहांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही तीन महिन्यांत नियमांचे पालन न केल्यास, त्या उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता.