अलिबाग - रायगड जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 15 तालुक्यातून सरपंच पदासाठी 380 आणि सदस्य पदांसाठी 2056 असे एकूण 2436 नवे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील दाखल उमेदवारी अर्जांबाबत रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती. शुक्रवार (20 आॅक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. उमेदवारांच्या बाहू गर्दीमुळे निवडणूक यंत्रणेवर प्रचंड तणाव दिसत होता.
रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी तर अलिबाग तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या 157 सदस्य पदांसाठी, मुरुडमधील 15 ग्रामपंचायतींच्या 145 सदस्य पदांसाठी, पेणमधील 11 ग्रामपंचायतींच्या 118 सदस्य पदांसाठी, पनवेलमधील 17 ग्रामपंचायतींच्या 175 सदस्य पदांसाठी, उरणमध्ये 3 ग्रामपंचायतींच्या 41 सदस्य पदांसाठी, कर्जत 7 ग्रामपंचायतींच्या 67 सदस्य पदांसाठी, खालापुरात 22 ग्रामपंचायतींच्या 202 सदस्य पदांसाठी, रोहामध्ये 12 ग्रामपंचायतींच्या 51 सदस्य पदांसाठी, सुधागडमध्ये 13 ग्रामपंचायतींच्या 112 सदस्य पदांसाठी, माणगावमध्ये 26 ग्रामपंचायतींच्या 222 सदस्य पदांसाठी, तळा येथे 6 ग्रामपंचायतींच्या 50 सदस्य पदांसाठी, महाडमध्ये 21 ग्रामपंचायतींच्या 149 सदस्य पदांसाठी, पोलापुरात 22 ग्रामपंचायतींच्या 162 सदस्य पदांसाठी, श्रीवर्धनमध्ये 8 ग्रामपंचायतींच्या 60 सदस्य पदांसाठी आणि म्हसळामध्ये 12 ग्रामपंचायतींच्या 88 सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच 99 सदस्यपदांसाठी आणि 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होत आहेत.
शुक्रवारी अलिबाग तालुक्यातील 40, मुरुड 25, पेण तालुक्यातील 17, पनवेल 49, उरण 9, कर्जत 25, खालापूर 39, रोहा 33, सुधागड 12, माणगाव 40, तळा 15, महाड 31, पोलापुर 25, श्रीवर्धन 12 आणि म्हसळा तालुक्यातील 8 अशा 15 तालुक्यातील 180 सरपंच पदांसाठी एकूण 380 नवे उमदेवारी अर्ज दाखल झाले. अलिबाग तालुक्यातील 239, मुरुड 204, पेण 96, पनवेल 302, उरण 66, कर्जत 119, खालापूर 183, रोहा 184, सुधागड 75, माणगाव 193, तळा 36, महाड 147, पोलापुर 138, श्रीवर्धन 41 आणि म्हसळा तालुक्यातील 33 अशा 15 तालुक्यातील 1854 सदस्य पदांसाठी एकूण 2056 नवे उमदेवारी अर्ज दाखल झाले. किती ग्रामपंचायती, सरपंच पदे, सदस्य पदे बिनविरोध होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.