रायगडमध्ये ४७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:28 PM2020-11-15T23:28:57+5:302020-11-15T23:29:12+5:30
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध क्लुप्त्या लढवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोना संसर्गाची दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत, तर गेल्या महिनाभरापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध क्लुप्त्या लढवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. नागरिकांच्या सजगतेमुळे कोरोना विषाणूचा रोख कमी झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती, तर सध्या ४७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त पनवेल महानगर पालिका क्षेत्रात ४७४ रुग्ण आढळले आहेत. तळा तालुक्यात ० तर मुरुड, म्हसळा, पोलादपूर तालुक्यात २ रुग्णांची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यात ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५५ हजार ५०५ रुग्णांची संख्या पार केली आहे. २ लाख १९ हजार ७२० नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची आजची संख्या १ हजार १५ आहे. यातील ४७७ रुग्ण हे घरीच उपचार करून घेत आहेत. त्यामुळे रुग्णांवर आलेले मानसिक दडपण कमी झाले आहे, तसेच नागरिकांमध्ये आता सजगता आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५८० जणांचा मृत्यू झाला असला, तरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आले आहे. कोरोनाचा जोर कमी झाल्याने नागरिक देखिल बिनधास्त झाले अस्ल्याचे पहावयास मिळत
आहेत.
गृह विलगीकरणासाठी अटी
गृह विलगीकरणासाठी राहिलेल्या रुग्णाने स्वत:ला एका रूममध्ये राहावे, घरातील इतर व्यक्तींशी संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी. रुग्णाला दिलेले औषधोपचार त्याने वेळेवर घ्यावे, तसेच पोषक आहार करावा. दिवसातून
एकादा ऑक्सिजन लेव्हल तपासून घ्यावी. गरम पाणी
प्यावे, स्वच्छता ठेवावी. रुग्णाला आरोग्य विषयक सल्ला
देऊन त्याचे मानोबळ वाढविण्याचा प्रयत्न करावा. रुग्णाला सकारात्मक वातावरण मिलाले तर रुग्ण लवकर बरा होतो.
तसे प्रयत्न होणे गरजेचे आहेत असे डॉक्टरांनी सांगितले
आहे.
रोज आरोग्य विभाग घेतो माहिती
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी रोज आरोग्य विभागामार्फत रुग्णास फोन केला जातो. रुग्णाची ऑक्सिजन लेवल व त्याचे टेंम्प्रेचरची माहिती घेतली जाते.
i