शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
3
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
7
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
8
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
9
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
10
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
11
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
12
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
13
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
14
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
15
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
16
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
17
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
19
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
20
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?

48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा

By निखिल म्हात्रे | Published: November 22, 2023 9:46 PM

दुसऱ्या दिवशी कुस्तीमध्ये नवी मुंबई विभाग अव्वल

अलिबाग- 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यांमध्ये रायगड आणि नवी मुंबई विभागांनी दमदार कामगिरी केली. रायगड विभागाच्या पुरुष आणि महिला गटातील खेळाडूंनी विजयी घोडदाैड सुरु ठेवली आहे. कुस्तीमध्ये नवी मुंबई विभागाने सर्वाधिक यश मिळविले आहे. 

रायगड पोलीस विभागातर्फे 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान अलिबागमध्ये होत आहेत. मंगळवारी दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या फुटबाॅल स्पर्धेत 6 सामन्यांपैकी तीन सामन्यात नवी मुंबई, रायगड, पालघर विजयी ठरले. तीन सामने अनिर्णित राहिले. रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. हाॅलीबाॅलच्या तीन सामन्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग विजयी झाले. यात रायगडने नवी मुंबईचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई विजेते ठरले असून रायगडने पालघरचा पराभव केला. खो-खोमध्ये रायगड, पालघर आणि नवी मुंबई संघ विजयी झाले असून रायगडने सिंधुदुर्गचा पराभव केला. कबड्डीच्या तीन सामन्यात नवी मुंबई, रत्नागिरी, रायगड विजयी असून रायगडने पालघरचा पराभव केला आहे. हॅन्डबाॅलमधील तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण विजयी असून रायगडने रत्नागिरीचा पराभव केला आहे.अॅथलेटीक्समध्ये रायगडने चांगले यश मिळवले आहे. 5000 मीटरमध्ये रायगडचा श्रीयश गुरव चतुर्थ, गोळाफेकमध्ये आकाश गोळे, राहुल राठोड, 400 मीटर धावणेमध्ये  विशाल पाटील, शुभम नांदगावकर या रायगडच्या खेळाडूनी यश मिळविले. उंच उडीमध्ये रितेश यादव, महेश ठाकूर हे प्रथम व तृतीय क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या वजनी गटाच्या 10 प्रकारात नवी मुंबईच्या 14 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तर त्यापाठोपाठ रायगडच्या 13 कुस्तीपटूना क्रमवारीत स्थान मिळविले आहे.

महिलांच्या व्हाॅलीबाॅलच्या तीन सामन्यांत रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे विजेता असून रायगडने नवी मुंबईचा पराभव केला. बास्केटबाॅलच्या तीन सामन्यात रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई संघ विजेते ठरले असून येथे रायगडने पालघरचा पराभव केला. खो-खोच्या तीन सामन्यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. तर नवी मुंबई, पालघर यांनीही आगेकुच केली आहे. कबड्डीच्या तीन सामन्यात रायगड, नवी मुंबई, ठाणे विजेते ठरले. यात रायगडने रत्नागिरीचा पराभव केला. अॅथलेटिक्समधील 5000 मीटरमध्ये रायगडच्या अपर्णा मगर, माधुरी लोखंडे यांनी यश मिळविले. उंच उडीमध्ये रत्नागिरीचे खेळाडू अव्वल आहेत. कुस्तीच्या 10 प्रकारच्या वजनी गटात रायगडच्या 12 खेळाडूंनी पहिल्या चार क्रमवारीत स्थान मिळवले आहे. त्यानंतर नवी मुंबईच्या 8, सिंधुदुर्ग 4, पालघर 6, रत्नागिरी व ठाणे ग्रामीणच्या प्रत्येकी तीन खेळाडूंनी पहिल्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग