इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

By राजेश भोस्तेकर | Published: July 20, 2023 11:42 AM2023-07-20T11:42:37+5:302023-07-20T11:43:52+5:30

Raigad Irshalwadi Landslide: खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी स्थित असून, सदरील वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे.

5 dead, 21 injured in Irshalwadi accident; Rescue operations hampered by rain | इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत ५ मृत्यू, २१ जखमी; पावसामुळे बचाव कार्यात अडथळा

googlenewsNext

रायगड – खालापूरच्या इर्शाळवाडी इथं रात्री साडे अकराच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी दरड कोसळल्याने आदिवासीवाडीतील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास प्रशासनाला कळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु दुर्गम भाग व मुसळधार पाऊस यामुळे रात्री १२ ४० व्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी बचाव पथकासह पोहचली.

बचाव पथकात कोण सहभागी?

बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे २५ स्वयंसेवक, ३० चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ २०, नगरपालिका खोपोली यांचेकडील २५ कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील १५ कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील १५ स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींच सहभाग आहे. इरशाल गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, अॅम्बुलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

इर्शाळवाडीत किती लोकसंख्या?

खालापूर तालुक्यातील मौजे चौक मानिवली महसूली गावाच्या हद्दीतील इर्शाळवाडी स्थित असून, सदरील वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे.

इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खालापूर तालुक्यामध्ये दि. १७/०७/२०२३ ते दि.१९/०७/२०२३ या ३ दिवसामध्ये एकूण ४९९ मिमि पावसाची नोंद झालेली आहे. सदर ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे जागते. सद्यस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तथापिक NDRF पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य 'युध्द पातळीवर सुरु आहे.

Web Title: 5 dead, 21 injured in Irshalwadi accident; Rescue operations hampered by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.