कर्जत पोलीस हद्दीत ३,८३० घरगुती व सार्वजनिक १४ गणरायमूर्तींचे, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २,०८३ घरगुती, तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५२ घरगुती आणि सार्वजनिक एक गणराय असे एकूण ५,९६५ घरगुती व १५ सार्वजनिक गणरायमूर्तींचे अशा एकूण ५९८० गणराय आणि तालुक्यातील एकूण २,६०८ गौरीमूर्तींचे साश्रूनयनांनी विसर्जन करण्यात आले.
तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५,९६५ गणरायमूर्ती व २६०८ गौरीमूर्तींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत दणाणून जात होता. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे भावपूर्ण आवाहन करीत गणराय व गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कर्जत नगरपरिषद व नेरळ ग्रामपंचायतीने विसर्जन ठिकाणी चोख व्यवस्था ठेवली होती. कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज होती.