हवामान बदलामुळे ७० टक्के पक्ष्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:56 AM2020-03-06T00:56:34+5:302020-03-06T00:56:39+5:30

एकंदरच सर्वच पर्यावरणाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.

 5 percent of the birds are backed by climate change | हवामान बदलामुळे ७० टक्के पक्ष्यांची पाठ

हवामान बदलामुळे ७० टक्के पक्ष्यांची पाठ

Next

गिरीश गोरेगावकर 
माणगाव : महाराष्ट्रात सर्वत्रच येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून आले आहे, ही परिस्थिती वातावरणातील तीव्र बदलामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. कमीत कमी २० डिग्री ते जास्तीत जास्त ३८-४० डिग्री असे एकाच दिवसात तापमान जवळ-जवळ २० डिग्रीने कमी-जास्त होत असल्याची, तसेच ० टक्के आर्द्रता फेब्रुवारी महिन्यातच असल्याची कोकणपट्ट्यात नोंद झाली आहे. एकंदरच सर्वच पर्यावरणाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.
माणगाव परिसरात दर वर्षी हिवाळ्याच्या मोसमात अनेक परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात; परंतु या वर्षी त्यांच्या स्थलांतरामध्ये आश्चर्यकारक घट झाल्याचे दिसून आले. तसेच हिवाळ्याच्या सुरुवातीला काही पॅसेज मायग्रंट म्हणजेच लांबपल्ल्याच्या स्थलांतरादरम्यान काही काळ विश्रांती घेण्यासाठी उतरणारे पक्षी असतात. या वर्षी त्यातील एकही पक्षी कोकणातील या पट्ट्यात दिसला नाही.
कोकणात स्थलांतर करणाºया पक्ष्यांमध्ये मुख्यत: पाणथळ जागी स्थलांतर करणारे पक्षी असतात. त्यामध्ये अनेक प्रकारची बदके आणि पाणथळीतल्या इतर पक्ष्यांचा समावेश असतो. दरवर्षी येथील धरण परिसर व सखल दलदलीचे प्रदेश हिवाळ्यात पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले दिसून येतात; परंतु या वर्षी हिवाळा संपून गेला, तरी असे काहीच झाले नाही. स्थलांतरित पक्षी सोडून कोकणात येथील मूळच्या असलेल्या पक्ष्यांच्या संख्येमध्येही मोठी घट दिसून येत आहे, ही मोठी चिंताजनक बाब आहे, अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी येथील काही मूळच्या पक्ष्यांचे प्रजनन प्रक्रियाचक्र बिघडल्याचे दिसून आले होते. काही मोजके पक्षी सोडल्यास इतर सर्वसाधारण आढळून येणाºया पक्ष्यांच्या संख्येमध्येही मोठी घट दिसून येत आहे. या पक्ष्यांनी कोकणपट्टा सोडून इतरत्र स्थलांतर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गतवर्षी पुण्यामधील काही प्रदेशांमध्ये सर्वात जास्त पाऊस झाला व गेल्या काही दशकांमध्ये जेथे पाणी उपलब्ध नव्हते, तेथे तळे साचली असल्याने मुबलक पाणीसाठा निर्माण झाला, तेथील प्रदेशात सर्वत्र पक्ष्यांच्या हालचालींची नोंद चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अंतर्देशीय स्थलांतरित होणाºया पक्ष्यांचा मुख्य कल कोकणपट्टा सोडून अधिक पूर्वेकडील भाग असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
>निसर्गचक्रात सर्वच जीव आणि गोष्टी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. निसर्गावर जीव व जीवांवर निसर्ग अवलंबून आहे, त्यामुळे पर्यावरणात होणारे वाईट बदल हे सर्वांच्याच दृष्टीने वाईट परिणामकारक ठरणार हे अटळ सत्य आहे.
- शंतनू कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव

Web Title:  5 percent of the birds are backed by climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.