शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पायपीट थांबणार : पेयजल योजनेसाठी ५० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 4:54 AM

अलिबाग तालुक्यात श्रेयावरून भाजपा- शेकाप यांच्यात कलगीतुरा

अलिबाग : तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील १०९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ३४ योजनांना मंजुरी मिळून तब्बल ४९ कोटी ६६ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

पेयजल योजनेमुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास मदत मिळणार असल्याची माहिती भाजपाचे अलिबाग-मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र विकासकामांच्या श्रेयावरून भाजपा आणि शेकाप यांच्यात आता चांगलाच कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसून येते. सध्या अलिबाग तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असली तरी बहुतांश कामे विविध कारणांनी लटकली आहेत. अलिबाग-रेवस रस्त्यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. परंतु शेकापच्या स्थानिक आमदारांनीच तो आणल्याच्या वल्गना केल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपाने जरी विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असला, तरी स्थानिक ग्रामपंचायती स्तरावरून विरोध होणार नाही का, असा प्रश्न मोहिते यांना विचारला असता,नागरिकांना विकास हवा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, परशुराम म्हात्रे, उदय काठे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत शेकापचे आमदार सुभाष पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, विकासकामांचे श्रेय शेकापने कधीच घेतले नाही. पाणीपुरवठ्याच्या भरीव निधीसाठी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत बैठकही घेण्यात आली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अलिबाग तालुक्याला सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.अलिबाग तालुक्यातील ३४ गावांत योजना राबवण्यात येणार आहेगाव मंजूर निधीताडवागळे २ कोटी ८६ लाखरांजणखार डवली ८९ लाखपरहूर १ कोटीमिळकत खार ७० लाखशहापूर ३ कोटी २३ लाखमानतर्फे झिराड २ कोटी ४० लाखवाघोडे ३९ लाखसुडकोली ६३ लाखरामराज १४ लाखमुळे ४६ लाखसारळ २ कोटी १८ लाखगाव मंजूर निधीमापगाव १ कोटी ७२ लाखआक्षी २ कोटी २८ लाखआवास २ कोटी ४१ लाखथळ (चाळमाळ) १ कोटी ७८ लाखखिडकी ४६ लाखकुसुंबळे १ कोटी ४८ लाखवाघ्रण ५७ लाखधोकवडे १ कोटी ६४ लाखसासवणे १ कोटी ५७ लाखकुर्डूस ३३ लाखचरी ३४ लाखगाव मंजूर निधीचिंचोटी ४९ लाखकुसुंबळे १७ लाखथळ (भाल,तुडाळ) १ कोटी ९० लाखथळ (वायशेत) १ कोटी ४८ लाखबोरघर ३६ लाखचेंढरे ४ कोटी ८० लाखचौल ३ कोटी १० लाखरेवदंडा २ कोटी २३ लाखनारंगी ४९ लाख २५ हजारशिरवली २२ लाखआंबेपूर ४ कोटी ९६ लाख

टॅग्स :Waterपाणीalibaugअलिबाग